[Video] पायलट बनता-बनता थेट गायक बनला! 

बी टाऊन
Updated Sep 15, 2019 | 13:52 IST | टाइम्स नाऊ मराठी

Tanishk Bagchi: बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक तनिष्क बागचीने नुकतंच झूम टीव्हीला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आहे. या दरम्यान, तनिष्कने अनेक गोष्टींचा उलगडा केला. 

Tanishk Bagchi_insta
[Video] पायलट बनता-बनता थेट गायक बनला!   |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: 'तनु वेड्स मनु रिटर्न्स'च्या 'बन्नो तेरा स्वॅगर' या गाण्याने बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या गायक तनिष्क बागची याने नुकतीच झूम टीव्हीसोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत केला आहे. या दरम्यान, तनिष्कने त्याने जिथे आपलं बालपण घालवलं तेथील म्हणजेच कोलकातामधील आठवणींना उजाळा दिला. यावेळी तनिष्कने असं सांगितलं की, त्याचं स्वप्न पायलट होण्याचं होतं. पण पैशाच्या कमतरतेमुळे तो ते स्वप्न पूर्ण करु शकला नाही. 

दरम्यान, असं असलं तरीही आज तनिष्कने बॉलिवूडमध्ये गायक म्हणून चांगलं नाव कमावलं आहे. तनिष्कचं नुकतंच एक नवं गाणं 'खुद से ज्यादा' हे रिलीज झालं आहे. जे प्रेक्षकांना खूप आवडत असल्याचं सोशल मीडियावरुन दिसतं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...