The Big Bull: 'द बिग बुल' सिनेमाचा ट्रेलर रिलीज, पाहा व्हिडिओ

बी टाऊन
Updated Mar 19, 2021 | 22:34 IST

The Big Bull trailer: बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री इलियाना डिक्रूज यांच्या 'द बिग बुल' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 

थोडं पण कामाचं

  • अभिनेता अभिषेक बच्चनच्या आगामी 'द बिग बुल' सिनेमाचा ट्रेलर रिलीज
  • घोटाळ्याचा मास्टरमाईंडच्या भूमिकेत ट्रेलरमध्ये दिसला अभिषेक बच्चन 
  • 'द बिग बुल' सिनेमा ८ एप्रिल रोजी हॉटस्टारवर होणार रिलीज 

The Big Bull official trailer release: अभिनेता अभिषेक बच्चनच्या 'द बिग बुल' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमाची कहाणी हर्षद मेहताच्या आयुष्याशी संबधित आहे. मुख्य भूमिका अभिषेक बच्चनची आहे. जो भारतात शेअर बाजाराचा चेहरा बदलणाऱ्या ब्रोकरच्या भूमिकेत आहे.

या सिनेमात अभिषेक बच्चन हा घोटाळ्यातील मास्टरमाईंडच्या रुपात पहायला मिळणार आहे. ३ मिनिट ८ सेकंदाचा हा ट्रेलर डॉयलॉग्सने भरलेला आहे. या ट्रेलर पाहून तुम्हाला स्कॅम १९९२ची आठवण करुन देईल. 

या सिनेमाचे दिग्दर्शक कुकी गुलाटी आहे. बिग बुल सिनेमात अभिनेत्री इलियाना डिक्रूज मुख्य भूमिकेत पहायला मिळणार आहे. सोबतच राम कपूर, सुमित वत्स, सोहम शाह, निकिता दत्ता आणि रेखा त्रिपाठी सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 'द बिग बुल' सिनेमा ८ एप्रिल रोजी हॉटस्टारवर रिलीज होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी