Bigg Boss Season 2 विजेत्यावर आली ढाबा चालवण्याची वेळ, जाणून घ्या का सोडली इंडस्ट्री

बी टाऊन
भरत जाधव
Updated Sep 18, 2022 | 09:55 IST

 बिग बॉस (Bigg Boss ) सीझन 16 लवकरच प्रसारित होणार आहे. या शोमध्ये आलेल्या प्रत्येक स्पर्धेकाला वेगळी ओळख मिळत असते, तर विजेत्याला प्रसिद्धी अन् पैसा मिळत असतो. बिग बॉसचा पहिला सीझन 2006 मध्ये प्रसारित झाला होता.

Time for the Bigg Boss Season 2 winner to run the dhaba
Bigg Boss Season 2 विजेत्यावर आली ढाबा चालवण्याची वेळ  |  फोटो सौजन्य: Times Now

Bigg Boss Season two winner Ashutosh Kaushik:  बिग बॉस (Bigg Boss ) सीझन 16 लवकरच प्रसारित होणार आहे. या शोमध्ये आलेल्या प्रत्येक स्पर्धेकाला वेगळी ओळख मिळत असते, तर विजेत्याला प्रसिद्धी अन् पैसा मिळत असतो. बिग बॉसचा पहिला सीझन 2006 मध्ये प्रसारित झाला होता. या भागाचा विजेता बॉलिवूड (Bollywood ) अभिनेता (actor ) राहुल रॉय (Rahul Roy) होता. यानंतर दुसरा सीझन आशुतोष कौशिकने (Ashutosh Kaushik) जिंकला होता. आशुतोषने यापूर्वी रोडीजचा शोदेखील जिंकला आहे. बिग बॉस जिंकल्यानंतर आशुतोष जिल्हा गाझियाबादमध्ये अर्शद वारसीसोबत आणि सैफ अली खानसोबत शॉर्टकट रोमियोमध्ये दिसला.  मात्र आज आशुतोषवर ढाबा चालवण्याची वेळ आली आहे. (Time for Bigg Boss Season 2 winner to run a dhaba, know why he left the industry)

दरम्यान, आशुतोषला चित्रपटसृष्टीत फारसे यश मिळाले नाही. आशुतोष उत्तर प्रदेशातील सराहानपूर येथील आपल्या घरी परतले. आशुतोषने ढाबा उघडला आहे दरम्यान रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्यापूर्वीही तो ढाबा चालवत असे. ढाबा सुरू केल्यानंतर तो म्हणाला की, आपलं नशीबाला मी चांगलं शिवजवू शकलो नाही. मात्र नशीब चांगलं होतं आणि देवाचा आशीर्वाद होता म्हणून मी रिऑलिटी शो जिंकलो. ढाब्यासाठी मी फार कष्ट घेतले नाहीत, गोष्टी त्यांच्याच बळावर झाल्या. मनोरंजन क्षेत्रात मी खूप संघर्ष पाहिला आहे. मला तिथे कसे जायचे ते माहित नव्हते पण मला ढाबा कसा चालवायचा हे माहित होते. म्हणूनच मी ते काम चोख बजावले. आशुतोष सहारनपूरमध्ये दोन ढाबे चालवतात. त्याचवेळी उत्तराखंडमध्ये त्यांचे शोरूमही आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी