मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये परतली आहे. कारण की, आगामी सिनेमात ती अभिनेता फरहान अख्तरसोबत The Sky Is Pink या सिनेमात दिसणार आहे. दरम्यान, या सिनेमाची स्टार कास्ट आणि दिग्दर्शिका सोनाली बोस यांनी झूमला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. याच मुलाखतीदरम्यान अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही आपल्या वडिलांविषयी बोलताना फारच भावुक झाल्याचं दिसून आली.
प्रियंका चोप्राने सांगितलं की, 'एक अभिनेत्री म्हणून तुम्हाला तुमचं खासगी आयुष्य विसरुन तुम्हाला कॅमेऱ्यासमोर १०० टक्के द्यावे लागतात.' प्रियंका पुढे म्हणाली की, 'आज मी जिथवर पोहचली आहे त्याचं श्रेय हे फक्त हिंदी सिनेसृष्टीलाच जातं. त्या एका गोष्टीमुळेच आज मी इथे आहे.'
प्रियंका चोप्रा असंही म्हणाली की, 'अभिनयातील सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी या फक्त बॉलिवूडमुळेच शिकता आल्या.' प्रियंका चोप्राचा The sky is pink हा सिनेमा ११ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.