[VIDEO] ट‍िकटॉक स्‍टार्ससोबत टोनी कक्‍करचे ठुमके

बी टाऊन
Updated Oct 16, 2019 | 18:23 IST

टोनी कक्करचं "नागिन" हे गाणं प्रदर्शित झालं आहे. या व्हिडिओमध्ये टिकटॉक स्टार्स त्याच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. बघा या डान्सचा व्हिडिओ.

मुंबई :  कोका कोला तू आणि धीरे धीरे  या गाण्यांमुळे टोनी कक्कर सध्या चर्चेत आला आहे. त्याचं आगामी गाणं  नागिन हे प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याचा व्हिडिओ खूप प्रसिद्ध होत आहे. नागिन या गाण्यावर टोनीने स्वत: डान्स करून, इतर टिकटॉक कलाकारांना देखील या गाण्यावर नाचवलं आहे.

टोनी कक्करने नागिन या गाण्याला लिरिक्स आणि म्युझिक हे दोन्ही दिले आहेत. हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर २४ तासांच्या आत जवळजवळ २० लाख वेळा युट्यूबवर पाहिलं गेलं आहे. तसेच या गाण्याच्या व्हिडिओमध्ये  काही टिकटॉक कलाकारांनी देखील, आपल्या स्टाईलमध्ये ठुमका दिलेत आणि ते डान्स करताना दिसताहेत. टोनी कक्करची बहिण बॉलिवूड पार्श्वगायिका नेहा कक्कर सुद्धा या व्हिडिओतून आपल्याला वेगळया स्टाईलमध्ये डान्स करताना दिसतंय. 

या व्हिडिओचं एक वैशिष्ट म्हणजे, हा व्हिडिओ एका डान्स क्लासमध्ये बनवला गेला आहे. ज्यामध्ये वेगवेगळ्या शरीराचे, वयाचे आणि आकाराचे लोकसुद्धा या गाण्याच्या माध्यमातून डान्स करताना दिसत आहेत. तसेच हे स्टार्स डान्स करण्याबरोबरच या गाण्याचा भरपूर आनंद घेताना दिसत आहेत.

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी