[VIDEO] सिंगर बादशाह हे खरे नाव, पाहा त्याचे १० सुपरहीट गाणी

बी टाऊन
Updated Nov 29, 2019 | 18:36 IST

बॉलिवूडचा रॅपर सिंगर बादशाहचे अनेक हिंदी आणि पंजाबी गाणे हिट झाले आहेत. तसंच त्याच्या दहा सुपरहिट गाण्यांचा व्हिडिओ समोर आला आहे. चला तर मग पाहुयात...

मुंबई :  बॉलिवूडचा रॅपर सिंगर बादशाहचे अनेक हिंदी आणि पंजाबी गाणे हिट झाले आहेत. त्याचबरोबर त्याच्या चाहत्यांकडूनही गाण्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्याच्या रॅपने तर हिंदी गाण्यांमध्ये धुमाकूळ घातला आहे. तसंच बादशहाचं खरं नाव हे आदित्य प्रतीक सिंह सिसोदिया आहे. मात्र बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये त्याचे चाहते त्याला बादशहा याच नावाने ओळखतात. बादशाहच्या दहा सुपरहिट गाण्यांचा व्हिडिओ समोर आला आहे. चला तर मग पाहुयात...

या व्हिडिओमध्ये बादशाहने प्रत्येक सिनेमात अभिनेता आणि अभिनेत्रीसोबत गायलेले धमाकेदार गाणे आहेत. तसंच प्रत्येक गाण्यात बादशाहचा लूक खूप आगळावेगळा दिसत आहे. या हिट झालेल्या गाण्यांचं नाव हे - अभी तो पार्टी, अक्कड बक्कड, तेरी याद आणि सेल्फी ले आदि. प्रकारची सुपरहिट गाणी आहेत. 

 

 

 

आदित्य प्रतीक सिंह सिसोदिया याने २००६ मध्ये आपल्या करिअरची सुरूवात, संगीत दिग्दर्शक आणि रॅपर सिंगर यो यो हनी सिंगसोबत केली होती. या दोघांनी काही गाणी एकत्र गायली होती. मात्र काही कारणास्तव हे दोघे वेगळे झाले. वेगळं झाल्यानंतर २०१५ मध्ये त्याच्या 'डीजे वाले बाबू' या गाण्याला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळालं. त्याचबरोबर हे गाणं २४ तासाच्या आत सुपरहिट झाल होतं. तसंच २०१४ पासून ते २०१९ पर्यंतची त्याची प्रत्येक गाणी सुपरहिट झाली आहेत.

 

 

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी