Khatron Ke Khiladi 12: एलिमिनेशनबद्दल ऐकलं अन् अभिनेत्री बेभान होऊ नाचली!

Khatron Ke Khiladi 12: टीव्ही अभिनेत्री अनेरी वजानी 'खतरों के खिलाडी 12' या टीव्ही शोमध्ये दिसली होती. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या शोमधून बाहेर पडण्याबद्दल बरेच काही शेअर केले आहे.

tv actress aneri vajani started dancing as soon as she heard news of her elimination khatron ke khiladi 12
Khatron Ke Khiladi 12: एलिमिनेशनबद्दल ऐकलं अन् अभिनेत्री बेभान होऊ नाचली! 

Khatron Ke Khiladi 12: रोहित शेट्टीचा लोकप्रिय टीव्ही रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी 12' सध्या खूप गाजत आहे. या शोमध्ये छोट्या पडद्यावरील अनेक स्टार्स दिसले, त्यातील एक म्हणजे अनेरी वजानी. (tv actress aneri vajani started dancing as soon as she heard  news of her elimination khatron ke khiladi 12)

अनेरी वजानी निश्चितपणे अंतिम फेरीत पोहोचेल अशी प्रेक्षकांची अपेक्षा होती पण ती बाहेर पडली. टीव्ही अभिनेत्रीने तिच्या एलिमिनेशनबद्दल बोलताना टेली टॉकला सांगितले की, तिला असे वाटत होते की ती रडेल पण तसे काही झाले नाही. यानंतर अनेरीने सांगितले की, जेव्हा रोहित शेट्टीने तिला सांगितले की, आता या शोमध्ये तिचा प्रवास संपला आहे, रोहित शेट्टीचं हे बोलणं ऐकताच ती चक्क बेभान होऊ नाचू लागली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी