Watch Video: शाहिद- कियाराकडून फॅन्सना सरप्राइज

बी टाऊन
Updated Jun 26, 2019 | 13:11 IST

गेल्या आठवड्यात शाहिद कपूरचा सिनेमा कबीर सिंग रिलीज झाला. या सिनेमाला प्रेक्षकांकडून जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहे. त्यातच शाहिद कपूर प्रेक्षकांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मुंबईच्या एका थिएटरमध्ये दाखल झाला. 

Kabir Singh
Video: शाहिद- कियाराकडून फॅन्सना सरप्राइज  |  फोटो सौजन्य: Instagram

गेल्या आठवड्यात रिलीज झालेला शाहिद कपूरचा सिनेमा कबीर सिंग बॉक्स ऑफिसवर धम्माल करतोय. या सिनेमानं ओपनिंग विकेंडपर्यंत ७० कोटी रूपयांहून अधिक कमाई केली होती. कबीर सिंग या सिनेमानं पहिल्या दिवशी २० कोटींहून जास्त कलेक्शन केलं. या रेकॉर्डसह शाहिद कपूर आणि कियारा आडवणी यांच्या करिअरमधील सर्वांत मोठा ओपनर सिनेमा ठरला आहे. कबीर सिंग सिनेमा आता १०० कोटींच्या क्लबमध्ये दाखल झाला आहे. यामध्येच विकेंडला सिनेमासाठी प्रेक्षकांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी शाहिद आणि कियारा मुंबईच्या एका थिएटरमध्ये दाखल झाले. 

या थिएटरमध्ये दोघांनी एकत्रित सिनेमा पाहिला आणि त्यानंतर लोकांची भेट घेऊन सिनेमाबद्दल विचारपूस केली. शाहिद आणि कियाराला एकत्र थिएटरमध्ये बघून प्रेक्षकांना खूप आनंद झाला. आता हा सिनेमा १०० कोटींच्या क्लबमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे २०१९ सालच्या यशस्वी सिनेमांच्या रेसमध्ये हा सिनेमा पुढे जात आहे. 

दुसरीकडे मुंबईच्या एका डॉक्टरनं कबीर सिंगच्या निर्मात्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. कारण या सिनेमात डॉक्टर्संचं चुकीचं रूप दाखवण्यात आलं आहे. सिनेमात शाहिदचं ब्रेक अप झाल्यानंतर तो एक मदयपी डॉक्टर होतो. आपलं दुःख कमी करण्यासाठी तो स्मोकिंगपासून ड्रग्सपर्यंतचा वापर करतो. यासोबतच त्याला खूप रागीट आणि हिंसक दाखवण्यात आलं आहे. जो आपलं प्रेम जे प्रीतीवर असते ते पुन्हा परत मिळवायचं असतं. 

मुंबईच्या डॉक्टरनं हे पाहिल्यानंतर मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. यासोबतच केंद्रीय आरोग्य मंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, राज्य आरोग्य मंत्रालय आणि सेंसर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन यांना देखील पत्र लिहिलं आहे. या पत्रात कबीर सिंग या सिनेमाची स्क्रिनिंग थांबवण्यासाठी सांगितलं आहे. मुंबईच्या या डॉक्टरनुसार, सिनेमात एका डॉक्टरची प्रतिमा खराब केली आहे. तक्रारीत म्हटलं की, डॉक्टरांची प्रतिमा वाईट  आणि नेगेटिव्ह पद्धतीनं सिनेमात दाखवली आहे. 

एकीकडे हा सिनेमा प्रेक्षकांना आवडत असला तरी दुसरीकडून या सिनेमावर टीका देखील होत आहे. सोशल मीडियावर काही फॅन्सनी या सिनेमात महिलांसाठी शाहिद कपूरची भूमिका ज्या पद्धतीनं दाखवली आहे. त्यावर जोरदार टीका केली जात आहे. लोकांच्या मते, हा सिनेमा कोणत्याही पद्धतीनं मास ऑडियन्ससाठी नाही आहे. हा सिनेमा केवळ महिलांसाठी लहान विचार करणाऱ्यांसाठी बनवला आहे. 

कबीर सिंग या सिनेमासाठी लोकांना त्रास या गोष्टींचा आहे की, कबीर सिंगच्या भूमिकेत कलाकार आपल्या घरकाम करणाऱ्या महिलांला मारण्यासाठी पळतो, महिलांसोबत गैरवर्तन करणं, मुलीच्या परवानगीशिवाय तिला किस करणं, महिलांसाठी छोटे विचार करणे. मात्र शेवटी सिनेमात हॅप्पी एंडिंग दाखवली आहे. कबीर सिंगला त्याच्या वर्तनासाठी कोणतीच शिक्षा मिळत नाही. एवढंच काय तर बॉलिवूड सिंगर सोना मोहापात्रानं ट्विट करून या सिनेमावर टीका केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Watch Video: शाहिद- कियाराकडून फॅन्सना सरप्राइज Description: गेल्या आठवड्यात शाहिद कपूरचा सिनेमा कबीर सिंग रिलीज झाला. या सिनेमाला प्रेक्षकांकडून जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहे. त्यातच शाहिद कपूर प्रेक्षकांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मुंबईच्या एका थिएटरमध्ये दाखल झाला. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola