[VIDEO] कुली नंबर 1 च्या सेटवर वरूण धवनची धमाल मस्ती, शेअर केला फनी व्हिडिओ 

बी टाऊन
Updated Sep 11, 2019 | 16:09 IST

वरूण धवननं आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये वरूण आपला आगामी सिनेमा कुली नंबर 1 च्या भूमिकेत खूप मस्ती करताना दिसत आहे. 

Varun Dhawan, Coolie No 1
[VIDEO] कुली नंबर 1 च्या सेटवर वरूण धवनची धमाल मस्ती, शेअर केला फनी व्हिडिओ   |  फोटो सौजन्य: Instagram

बॉलिवूड अॅक्टर वरूण धवन सध्या आपला होम प्रोडक्शनमध्ये बनणारा कुली नंबर 1 सिनेमा जरा बराच चर्चेत आहे. वरूणनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये वरूणनं कुली नंबर 1 सिनेमातली भूमिका कुंवर महेंद्र प्रतापच्या रूपात दिसत आहे. यासोबत वरूणनं सफेद रंगाचा हाफ स्लीव्ह जॅकेटसोबत बऱ्याच चैनी घातल्या आहेत. डेविड धवन यांनी दिग्दर्शित या सिनेमात वरूणसोबत सारा अली खान ही जोडी पहिल्यांदाच दिसणार आहे. 

कुली नंबर 1 गोविंदा आणि करिश्मा कपूरचा सिनेमा 1995 साली आलेला ऑरिजनल रिमेक आहे. कुली नंबर वनमध्ये करिश्मा कपूरच्या वडिलांची भूमिका कादर खान यांनी साकारली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...