[VIDEO] : वरुण धवन आणि नताशा दलालचं 'या' ठिकाणी होणार लग्न

बी टाऊन
Updated Aug 25, 2019 | 02:48 IST | Zoom

सूत्रांच्या माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेता वरुण धवन गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत लग्नाची तयारी करत आहे. २०२० मध्ये वरुण आणि नताशाचं लग्न एका भव्य ठिकाणी होऊ शकेल अशी बातमी आहे.

Varun Dhawan and Natasha Dalal
वरुण धवन आणि नताशा दलालचं लग्न  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन नताशा दलालसोबतच्या लग्नाच्या बातमीमुळे चर्चेत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, वरुण लवकरच आपल्या चाहत्यांना चांगली बातमी देणार आहे. वरुण २०२० मध्ये नताशाशी लग्न करणार आहे. हे डेस्टिनेशन वेडिंग असेल.  

दोघांच कुटुंब बाली किंवा फुकेत यापैंकी एक स्थान निश्चित करू शकतात. महत्त्वाचे म्हणजे वरुण आणि नताशा यांनी अद्याप या बाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. यापूर्वी अनुष्का-विराट, दीपिका-रणवीर आणि प्रियांका चोप्रा यांनी परदेशात डेस्टिनेशन वेडिंग केलं होते. वरूण धवन त्याचा आगामी चित्रपट 'कुली नंबर १'  शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात वरूण धवनसह सारा अली खान दिसणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी १ मे २०२० रोजी रिलीज होणार आहे. 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...