मुंबई: बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल यांचं सध्या अगदी मस्त चाललंय... कारण वरुण आणि नताशा हे नुकतेच सुट्टी एन्जॉय करुन घरी परतले आहेत. यानंतर वरुण आता ‘कुली नंबर वन’या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात करणार आहे.
वरुण धवन सध्या ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीनवर रोमांस करत आहे. वरुण धवन अलीकडेच आपली गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत गोव्यात सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेला होता.
दरम्यान, हे दोघेही याच वर्षी लग्न करणार होते. रिपोर्ट्सनुसार वरुण आणि नताशाचे डेस्टिनेशन वेडिंग करण्याचं ठरलं होतं. पण कोरोनामुळे त्यांनी आपल्या लग्नाचा प्लॅन पुढे ढकलला आहे. पण ते लवकरच लग्न करु शकतात अशी सध्या चर्चा आहे. वरुण धवन आणि नताशा हे शाळेतील मित्र आहेत. अनेकदा त्यांनी आपलं एकमेकांवरील प्रेम व्यक्त केलं आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर वरुण धवनकडे अनेक प्रोजेक्ट आहेत. वरुण आणि सारा अली खानचा चित्रपट कुली नंबर वन हा ख्रिसमसच्या दरम्यान Amazon प्राइम वर रिलीज होणार आहे.