[VIDEO] MeTooचे आरोपी सुभाष कपूर सोबत काम करण्यात आमिर खान तयार, समोर आले हे कारण 

बी टाऊन
Updated Sep 16, 2019 | 21:07 IST

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याने मीटू प्रकरणात आरोप लावण्यात आलेले फिल्ममेकर सुभाष कपूर यांच्यासोबत काम करण्याची तयारी दर्शवली आहे. आमिर खानच्या या मोठ्या निर्णयामागे एक कारणही आहे. 

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान सध्या गुलशन कुमार यांचे बायोपिक 'मोगुल'मुळे चर्चेत आहे. काही काळापूर्वी आमिरने या चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्यावर मीटूच्या आरोपानंतर हा चित्रपट सोडला होता. दरम्यान एका मुलाखतीत मिस्टर परफेक्शनिस्टने सांगितले की, मी आता या चित्रपटाचा भाग होण्यास तयार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आमिर खानच्या या निर्णयामागे त्याची पत्नी किरण राव हिचा हात आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार किरण राव हिने स्वतः सुभाष कपूर यांच्या सोबत काम करणाऱ्या अभिनेत्रीशी बातचित केली. त्यानंतर सर्व महिलांनी सुभाष कपूर यांच्याबाबत चांगले बोलले. त्यानंतर किरण राव हिने ही गोष्ट आमिरला सांगितली. मग आमिर खान याने पडत्या फळाची आज्ञा मानत चित्रपटात काम करण्याचे निश्चित केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी