शाहरुख, सलमान खानवर कमेंट; विवेक अग्निहोत्री होतोय भयंकर ट्रोल

Vivek Agnihotri trolled: साऊथ सिनेसृष्टी आणि हिंदी चित्रपटांच्या सततच्या पडझडीसाठी विवेक अग्निहोत्री याने आमिर, सलमान आणि शाहरुख खानला जबाबदार धरले आहे.

vivek agnihotri who is badly trapped is being trolled by commenting on shahrukh khan and salman khan
शाहरुख, सलमान खानवर कमेंट; विवेक अग्निहोत्री होतोय भयंकर ट्रोल  |  फोटो सौजन्य: Facebook

Vivek Agnihotri trolled for mocking Salman and Shah Rukh: 'द काश्मीर फाइल्स'चा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सोशल मीडिया यूजर्सच्या निशाण्यावर आला आहे. अलीकडेच त्याने बॉलिवूडच्या खान मंडळींवर निशाणा साधला आहे. साऊथ आणि हिंदी चित्रपटांच्या सततच्या पडझडीसाठी विवेक अग्निहोत्री याने आमिर, सलमान आणि शाहरुख खानला जबाबदार धरले आहे. 

आता विवेकवर सोशल मीडियावर टीका होत आहे. लोकांचे म्हणणे आहे की, एखादा चित्रपट हिट होताच तो प्रत्येक बाबतीत बोलू लागला आहे. नुकतेच विवेकने ट्विट करून बॉलिवूडच्या खान मंडळींवर निशाणा साधला आहे. 

त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले - 'जोपर्यंत बॉलिवूडमध्ये बादशाह आणि सुलतान आहेत तोपर्यंत बॉलिवूड बुडत राहील. तुमच्या कथांसह सामान्य लोकांचा उद्योग बनवा, मग तो जागतिक चित्रपट उद्योग होईल.' त्याच्या याच ट्विटनंतर तो ट्रोल होत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी