[VIDEO] इमरान हाशमी नव्या गाणे 'Lut Gaye'ची धूम, रिलीज झाल्यानंतर काही वेळातच मिळाले 24 लाख पेक्षा अधिक व्यूज

बी टाऊन
Updated Feb 18, 2021 | 11:15 IST

झुबिन नौटियाल यांच्या मधुर आवाजाने इमरान हाश्मीचे नवीन गाणे प्रसिद्ध झाले आहे. या गाण्याचे बोल मनोज मुतनशीर यांनी लिहिले आहेत आणि हे रिलीज होताच अनेकांनी त्याला पसंत केले आहे. 

थोडं पण कामाचं

  • अभिनेता इमरान हाश्मी याचे  एक नवीन गाणे १७  फेब्रुवारीला रिलीज झाल्यानंतर इंटरनेटवर धुमाकूळ घातल आहे.
  • युट्यूबवर रिलीज झाल्यानंतर थोड्याच वेळात 24 लाखाहून अधिक व्ह्यू या गाण्याला मिळाली आहेत.
  • या गाण्याचे शीर्षक 'लुट गये' आहे. व्हिडिओत युक्ती थरेजा अभिनेत्री म्हणून इमरानसोबत दिसली आहे.

मुंबई:  अभिनेता इमरान हाश्मी याचे  एक नवीन गाणे १७  फेब्रुवारीला रिलीज झाल्यानंतर इंटरनेटवर धुमाकूळ घातल आहे.  युट्यूबवर रिलीज झाल्यानंतर थोड्याच वेळात 24 लाखाहून अधिक व्ह्यू या गाण्याला मिळाली आहेत. या गाण्याचे शीर्षक 'लुट गये' आहे. व्हिडिओत युक्ती थरेजा अभिनेत्री म्हणून इमरानसोबत दिसली आहे. टी-सीरिजचे रोमँटिक गाणे तनिष्क बागची यांनी संगीतबद्ध केले असून मनोज मुंतशिर यांनी लिहिले आहे. तर  झुबिन नौटियाल यांच्या आवाजाने सजले आहे.

शुक्रवारी या गाण्याची घोषणा करण्यात आली आणि इमरानने इन्स्टाग्रामवर त्याविषयी माहिती दिली. हा चित्रपट दोन प्रेमींची कथा आहे ज्यात इम्रान एका गुंडाच्या भूमिकेत दिसला आहे आणि युक्ती त्याच्यावर प्रेम करते तर तिच्या कुटुंबाला हे मान्य नाही.  यानंतर एका सीनमध्ये अचानक गोळीबार झाल्यानंतर नायिका गोळ्या घालून जागीच ठार झालेली दिसत आहे..

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी