अर्जुनला पहिल्यांदा राखी बांधल्यानंतर जान्हवी कपूरला नेमकं काय वाटलेलं?

Janhvi Kapoor on Raksha Bandhan 2022: जान्हवी कपूर दरवर्षी रक्षाबंधनाचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करते. जान्हवी कपूरने आता एका मुलाखतीत सांगितले आहे की, तिच्यासाठी सर्वात संस्मरणीय रक्षाबंधन कोणतं होतं.

when janhvi kapoor tied rakhi to arjun kapoor for first time she told her most memorable raksha bandhan
अर्जुनला पहिल्यांदा राखी बांधल्यानंतर जान्हवी कपूरला नेमकं काय वाटलेलं?  |  फोटो सौजन्य: Instagram

Janhvi Kapoor on RakshaBandhan: देशाच्या अनेक भागांमध्ये 11 आणि 12 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे. बी टाऊनमध्येही हा सण साजरा केला जातो. राखीपौर्णिमेपूर्वी, जान्हवी कपूरने ती आणि तिचा भाऊ अर्जुन कपूर यांच्यातील राखीचा सर्वोत्तम क्षण कोणता होता हे सांगितलं. 

जान्हवी कपूरने एका मुलाखतीत सांगितले होते की, 'माझ्यासाठी रक्षाबंधन हा असा दिवस आहे की, जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र येतं.' जान्हवी म्हणते की, ज्या वर्षी तिने अर्जुन कपूरला पहिल्यांदा राखी बांधली ती तिच्यासाठी सर्वात अविस्मरणीय रक्षाबंधन होती. 

जान्हवीला वाटते की तिच्या भावंडांमुळे ती अधिक मजबूत आणि सुरक्षित आहे. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, तिला तिच्या मोठ्या भावाकडून आणि बहिणींकडून खूप काही शिकायला मिळाले आहे आणि ती त्याला खूप महत्त्व देते.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी