Zaira Wasim: झायरा वसीमच्या निर्णयाची चौकशी करा; पाहा कोणी केली मागणी!

बी टाऊन
Updated Jul 01, 2019 | 14:36 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Zaira Wasim: अभिनेत्री झायरा वसीम हिनं बॉलिवूडला राम राम करताना धर्माचं कारण पुढं केलं आहे. त्यावरून आता राजकीय दंगल सुरू झाली असून, काँग्रेस आणि भाजपनं यात उडी घेतली आहे. तिचा निर्णय धक्कादायक मानला जात आहे.

Zaira Wasim
Zaira Wasim: झायरा वसीमच्या निर्णयाची चौकशी करा; पाहा कोणी केली मागणी!  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई : दंगल आणि सिक्रेट सुपरस्टार यांसारख्या लोकप्रिय सिनेमांमध्ये काम केलेल्या झायरा वसीम हिनं बॉलिवूडला राम राम करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तिच्या या निर्णयानं सगळ्यांनाच चकीत केलं आहे. कारण, तिनं बॉलिवूड सोडण्यासाठी धर्माचं कारण पुढं केलं आहे. त्यावरून आता राजकीय दंगल सुरू झाली असून, काँग्रेस आणि भाजपनं यात उडी घेतली आहे. काल, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी झायराच्या निर्णयाचं समर्थन केलं होतं. तर, दुसरीकडं काँग्रेस आणि शिवसेनेनं तिच्या या निर्णयावर टीका केली आहे. भाजपनंही याची चौकशी करण्याची मागणी केली असून, या सगळ्याला आता राजकीय रंग येताना दिसत आहे. झायराने काल आपल्या फेसबुक अकाऊंटवरून आपला बॉलिवूड सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. तिच्या पीएने तिचं सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाल्याचं सांगून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. पण, पुन्हा झायरानं ती पोस्ट आपण स्वतः केल्याचं जाहीर केलं होतं.

प्रियंका चतुर्वेदींचे ट्विट

लोकसभा निवडणुकी दरम्यान काँग्रेससोडून शिवसेनेत सामील झालेल्या प्रियंका चतर्वेदी यांनी झायराच्या धर्माला पुढे करून घेण्यात आलेल्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की, तुम्हाला तुमची आस्था आकर्षित करत असेल तर तुम्ही त्याचे जरूर पालन करा. पण, धर्माचे नाव पुढे करून करिअरचा निर्णय घेऊ नका. हिंदी सिनेमामध्ये याच आस्थेच्या लोकांनी अनेक कीर्तीमान प्रस्थापित केले आहेत. त्यांना धर्माविषयी माहिती नाही का? प्रियंका चतुर्वेदी यांनी झायराचा निर्णय हा खूप प्रतिगामी असल्याचं म्हटलं आहे. त्या म्हणाल्या, ‘इस्लाममध्ये सहिष्णुतेला थारा नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. तृणमूल खासदार नुसरत जहाँच्या फतव्याशी याची तुलना करत आहेत. ते साफ चुकीचं आहे. तुम्ही हे ध्यानात घ्या की, जेव्हापासून झायरानं हिंदी सिनेमामध्ये करिअर सुरू केलं. तेव्हापासून काश्मीरमधील मूलतत्ववाद्यांनी तिला लक्ष्य केलं होतं.

 

 

 

झायराच्या निर्णयावर उलट-सुलट प्रतिक्रिया येत आहे. काहींनी तिचा हा निर्णय वैयक्तिक असल्याचं म्हटलंय तर, काहींनी तिच्या निर्णयाला दिवंगत अभिनेत विनोद खन्ना यांच्या निर्णयाशी जोडलं आहे. त्यांनीही करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना बॉलिवूडला अलविदा करत, ओशोंच्या चरणी आपलं आयुष्य समर्पित केलं होतं. माझा धर्म माझ्या करिअरच्या आड येत आहे,  असं त्यांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं. पण, काही काळानंतर त्यांनी इंडस्ट्रित पुनरागमन केलं होतं.

भाजपची चौकशीची मागणी

भाजपचे प्रवक्ते ब्रिगेडियर अनिल गुप्ता यांनी झायराच्या निर्णयाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. ते म्हणाले, ‘झायराला कोणी धमकी दिली आहे का? ती घाबरली आहे का? याची चौकशी झाली पाहिजे. काश्मीरमधील मूलतत्ववादाचे हे एक उदाहरण आहे.’ झायराच्या बॉलिवूड सोडण्याच्या निर्णयाचा सन्मान करत आहोत. पण, आस्थेच्या नावाखाली हा निर्णय चुकीचा आहे. आस्थेचा आणि अभिव्यक्तिचा दुरान्वये काहीही संबंध नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Zaira Wasim: झायरा वसीमच्या निर्णयाची चौकशी करा; पाहा कोणी केली मागणी! Description: Zaira Wasim: अभिनेत्री झायरा वसीम हिनं बॉलिवूडला राम राम करताना धर्माचं कारण पुढं केलं आहे. त्यावरून आता राजकीय दंगल सुरू झाली असून, काँग्रेस आणि भाजपनं यात उडी घेतली आहे. तिचा निर्णय धक्कादायक मानला जात आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola