[VIDEO] 'द बॉडी' या सिनेमातील पहिलंवहिलं गाणं रिलीज...

बी टाऊन
Updated Nov 27, 2019 | 18:58 IST

इम्रान हाश्मीच्या द बॉडी या सिनेमातील पहिलंवहिलं गाणं रिलीज झालं आहे. तसंच या गाण्याचं नाव 'झलक दिखला जा' असं आहे आणि या गाण्याचं रिक्रिएशन करण्यात आलं आहे.

मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये मागील काही दिवसांपासून जुन्या गाण्यांचं रिक्रिएशन करणं आणि त्या सिनेमांना हिट करणं अशी कामं चालू आहेत. तसंच इम्रान हाश्मी आणि ऋषी कपूर यांचा द बॉडी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील ट्रेलरला आणि आताच नवं रिलीज झालेल्या गाण्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या गाण्याचं नाव 'झलक दिखला जा' हे आहे. तसंच या गाण्याला सुरेल आवाज हिमेश रेशमियाने दिला आहे.

 २००६ मध्ये, रिलीज झालेल्या अनंत महादेवन दिग्दर्शित 'अक्सर' या सिनेमातील हे गाणं आहे. त्यामुळे या गाण्याला इम्रानच्या चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळालं होतं. द बॉडी सिनेमात तब्बल १३ वर्षानंतर या गाण्याचं नवं वर्जन रिलीज झालं आहे. त्याचबरोबर अदिल शेखने या गाण्याची कोरियोग्राफी केली आहे. या गाण्यामध्ये अभिनेता इम्रान हाश्मी आणि अभिनेत्री सोभिता धुलिपला यांची जोडी रोमँटिक दिसत आहे.

'झलक दिखला जा' या गाण्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे या सिनेमातील एक मोठं रहस्य बाहेर येण्याची शक्यता आहे. कारण हा सिनेमा ड्रामा थ्रीलरवर आधारित आहे. जीतू जोसेफ दिग्दर्शित या सिनेमात इम्रान हाश्मी, व्यतिरिक्त ऋषी कपूर, सोभिता धुलिपला आणि वेदिका या सिनेमात दिसणार आहेत. तसंच हा सिनेमा १३ डिसेंबर २०१९ ला रिलीज होणार आहे.

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी