Boyz च्या सुपरहिट तीन चित्रपटानंतर आता 'बॉईज 4' लवकरच!

Boyz 4 Poster: एकामागून एक आशा बॉईज चित्रपटाचे एकूण तीन भाग चांगलेच गाजले. रॉम कॉम पठडीतल्या या चित्रपटातील बॉईजच्या किशोरवयापासून ते कॉलेज जीवनापर्यंतच्या प्रत्येक रंजक सफरीचा आनंद आजवर प्रेक्षकांनी घेतला आहे. त्यामुळे सुपरहिट तीन भागानंतर बॉईज 4 ची घोषणा नुकतीच करण्यात आली. विशेष म्हणजे, मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पहिल्यांदाच असा चौथा भाग प्रदर्शित होताना दिसून येणार आहे.

Updated Sep 8, 2023 | 06:24 PM IST

'Boyz 4' poster released

'बॉईज 4' येत्या २० ऑक्टोबरला सर्वांच्या भेटीला येत आहे.

Boyz 4 Releasing Soon: मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सुपरहिट ब्लॉकबस्टर 'बॉईज'च्या सिरीजने सर्वांचे भरभरून मनोरंजन केले आहे. 'बॉईज ३'च्या भरघोस यशानंतर आता 'बॉईज 4' धमाका करायला येत आहेत. नुकतेच 'बॉईज 4'चे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून 'आपण येणार तर धमाका होणार' असं म्हणत 'बॉईज 4' येत्या २० ऑक्टोबर सर्वांच्या भेटीला येत आहेत.
यापूर्वी 'बॉईज' च्या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालता होता. आता यंदाच्या वर्षी धैर्या, ढुंग्या आणि कबीर काय धमाका करणार आहेत, हे पाहाण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत 'बॉईज 4' चे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया हे निर्माते आहेत तर ऋषिकेश कोळी यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे. वैशिष्टय म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील हा एकमेव चित्रपट आहे, ज्याचे चार भाग आले आहेत.
या चित्रपटामध्ये पार्थ भालेराव, सुमंत शिंदे आणि प्रतीक लाड ही तिकडी पुन्हा एकदा एक नवीन गोष्ट घेऊन प्रेक्षकांसमोर येणार असून, रितिका शोत्रीची देखील यात महत्वपूर्ण भूमिका असणार आहे. तूर्तास या चित्रपटाच्या इतर स्टारकास्ट गुलदस्त्यामध्ये असून, 'बॉईज 4' मध्ये आता बॉईजचे कोणते भावविश्व मांडण्यात येणार आहे, हे पाहणे रंजक ठरणार आहे. तूर्तास प्रेक्षकांना या चित्रपटाच्या पोस्टरवर समाधान मानावे लागणार असून, चित्रपटाच्या ट्रेलर आणि सॉन्ग लॉंचपर्यंत प्रतीक्षा केल्याशिवाय गत्यंतर नाही.
'बॉईज 4' चित्रपटाबद्दल दिग्दर्शक विशाल देवरुखकर म्हणतात, "आतापर्यंत 'बॉईज'च्या तिन्ही भागांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. या तिन्ही भागांमध्ये काहीतरी सरप्राईस होते. 'बॉईज 4' मध्येही असेच सरप्राईस आहे. प्रेक्षकांचे मिळणारे प्रेम पाहूनच आम्हाला 'बॉईज 4' करण्याची प्रेरणा मिळाली. मला खात्री आहे, हा चित्रपटही प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करेल.''
ताज्या बातम्या

IIT Bombay: मुंबई IIT मध्ये शाकाहार-मांसाहारावरून पुन्हा वाद! मांसाहार करणाऱ्या विद्यार्थ्याला 10 हजारांचा दंड

IIT Bombay  IIT  -      10

Nanded Government Hospital Deaths: नांदेडमध्ये मृत्यूचं थैमान! आणखी 7 जणांचा मृत्यू, 4 बालकांचा समावेश; अशोक चव्हाण यांचं ट्वीट

Nanded Government Hospital Deaths     7   4

Asian Games 2023: यशस्वी जैस्वालने इतिहास रचला! आशियाई क्रीडा स्पर्धेत शतक झळकावणारा पहिला भारतीय

Asian Games 2023

इक्सिगोची 'इक्सिगो अशुअर्ड' सेवा, निवडक आंतरराष्‍ट्रीय फ्लाइट बुकिंग्‍जवर मिळणार Complete Refund Facility

         Complete Refund Facility

Lok Sabha Election 2024: काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवणार?

Lok Sabha Election 2024

Nanded News: नांदेडच्या शासकीय रुग्णालयात नेमकं काय घडलं? रुग्णालय प्रशासनानं सांगितलं कारण

Nanded News

इझमायट्रिपने स्‍मार्ट वॉईस रेकग्निशन टेक्‍नॉलॉजी केली लाँच, ट्रॅव्‍हल बुकिंग अनुभवाला नव्‍या उंचीवर घेऊन जाणार

धक्कादायक! बोरिवलीहून विरारला जाणाऱ्या लोकल ट्रेनवर दगडफेक, एसी लोकलच्या फोडल्या काचा

बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited