Citadel 2 Announced: ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा हिचा बहुचर्चित सिटाडेल सीझन 2 लवकरच येणार !

Citadel season 2: बहुचर्चित प्रियांका चोप्रा स्टारर सीटाडेल च्या पहिल्या सीझनचा शेवटचा एपिसोड प्रदर्शित होत असताना, प्रियांकाने सिटाडेलचा दुसरा सीझन घेऊन येणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे! प्रियांकाने दिलेल्या या बातमी मुळे तिचे चाहते खूप खुश झाले आहेत.

Updated May 27, 2023 | 01:33 PM IST

Citadel 2 Announcement

Citadel 2 announcement

Priyanka Chopra Jonas: प्रियांका चोप्रा जोनास आणि रिचर्ड मॅडन यांच्या सिटाडेल (Citadel) या वेब सिरिजने 200 देशांमध्ये जागतिक स्तरावर प्रचंड यश मिळवले आहे. यामधील अनेक दमदार सीन्सने आणि भागांतील अनेक ट्विस्टने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. प्रेक्षकांनी प्रत्येक एपिसोडनंतर नादिया सिंहच्या भूमिकेत असलेल्या प्रियांकाचे कौतुक केले आहे.
सोशल मीडियावर या सीरिजच्या चर्चा होताना दिसत आहेत. आता सिटाडेलचा शेवटचा एपिसोड रिलीज झाला असून, या दरम्यान प्रियांकाने सिटाडेल सीजन 2 वर काम करत असल्याची अधिकृत माहिती सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे.

तिची पोस्ट पहा:

जो रुसोने प्रत्येक एपिसोडला रंजक बनवण्यासाठी काय केलं याबद्दल प्रियांकाने या पोस्टद्वारे सांगितलेआहे. प्रियांकाने या भूमिकेसाठी खास मेहनत घेतली असून तिला खर्‍या आयुष्यात दुखापतीदेखील झाल्या आहेत. नादियाच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी प्रियांकाने सहा वेगवेगळ्या भाषांवर प्रभुत्व मिळवले.
जागतिक स्तरावरील सर्वात लोकप्रिय नवीन सिरिजमध्ये या शोने प्रथम क्रमांक पटकावला आहे. सिटाडेल ही अशी वेबमालिका आहे, ज्यामध्ये अनेक दक्षिण आशियाई कलाकारांनी काम केले आहे. प्रियांका ही दक्षिण आशियाई कलागुणांना जागतिक स्तरावर पुढे नेण्यासाठी, त्यांना त्यांच्या पात्रतेची ओळख देण्यासाठी खऱ्या अर्थाने अग्रणी आहे.
प्रियांका साठी 2023 हे वर्ष खास गेले आहे. कारण मेट गाला लूक असो, वा सिटाडेलमधील अॅक्शन सिक्वेन्स असो, तसेच 'लव्ह अगेन' च्या यशामुळे प्रियंका चांगलीच चर्चेत आहे. तसेच यावर्षी ती अनेक नवीन भूमिकामध्येदेखील दिसणार आहे. सिटाडेल व्यतिरिक्त प्रियांका 'राज्यप्रमुख' आणि 'जी ले जरा' या आगामी प्रोजेक्टमधून दिसणार आहे.
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited