Prashant Damle record : दामलेंच्या प्रशांतची 'विक्रमी' गोष्ट, बहुरूपी 12 हजार 500 प्रयोग

नमन नटवरा
Updated Nov 06, 2022 | 15:18 IST | टाइम्स नाऊ मराठी

Prashant Damle record : आज अर्थातच ६ नोव्हेंबरला मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात 12 हजार 500 प्रयोग सादर करत अभिनेता प्रशांत दामले (Prashant Damle) आगळावेगळा विक्रम करणार आहे. 'एक लग्नाची दुसरी गोष्ट'या नाटकाचा प्रयोग हा प्रशांतच्या वैयक्तिक कारकीर्दीतील 12 हजार 500 वा प्रयोग असेल. रंगमंचावरचा हा बादशाह या विक्रमासाठी सज्ज झालेला आहे.

Prashant Damle will set record of 12 thousand 500 natya prayog
प्रशांत दामलेंचा 12 हजार 500 प्रयोगांचा विक्रम  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • प्रशांत दामलेंचा 12 हजार 500 प्रयोगांचा विक्रम
  • षण्मुखानंद साभागृहात रंगणार विक्रमी प्रयोग
  • रंगमंचावरच्या बादशाहची विक्रमी घोडदौड

Prashant Damle record : 'श्शू.. कुठे बोलायचं नाही' असं म्हटलं तरी सगळ्याना कळलंच. रंगमंचावरचा हा बादशाहचा आता एका नव्या विक्रमासाठी सज्ज झालेला आहे. 
अभिनेता प्रशांत दामले (Prashant Damle) आज अर्थातच ६ नोव्हेंबरला मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात 12 हजार 500 प्रयोगांचा विक्रमी टप्पा गाठणार आहे. हे नाटक आहे 'एक लग्नाची दुसरी गोष्ट'. प्रशांत दामलेच्या हा प्रयोगाचा विक्रम म्हणजे केवळ लाजवाब. एखाद्या कलाकाराने इतके प्रयोग करणं आणि तेसुद्धा अधिकाधिक हाऊसफुल्ल करणं हे बहुदा एकमेव उदाहरण असावं. (Prashant Damle will set record of 12 thousand 500 natya prayog)

मराठी रंगभूमीवरील 'बुकिंगचा सम्राट' म्हणून ओळखला जाणारा हा अभिनेता प्रत्येकाला आपल्यातलाच वाटावा असा. मराठी नाटकाला घराघरात पोहोचवणारा, तरुणांना
रंगभूमीकडे खेचणारा हा अभिनेता आता 12 हजार 500 प्रयोगांचा विक्रमी टप्पा गाठणार आहे. 

तीस वर्षांपूर्वी 'टुरटुर'पासून सुरू झालेला हा प्रवास अविरतपणे सुरूच आहे. टुरटुरच्या यशानंतर या अभिनेत्याने मागे वळून पाहिलंच नाही. मोरूची मावशी, ब्रह्मचारी, लग्नाची बेडी, 
अशा एकाहून एक दर्जेदार नाटकांचा धमाकाचा प्रशांत दामलेने सुरू केला. मराठी रंगभूमीपासून दूर गेलेला नाट्यरसिक पुन्हा एकदा मराठी रंगभूमीकडे वळला आणि नाट्यगृहाबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड झळकू लागले. प्रशांत दामलेंचे नाटक म्हणजे हमखास गर्दी खेचणार नाटक हे जणू एक समीकरणंच झालं. 

साखर खाल्लेल्या या माधवचा रंगमंचावरचा वावर पाहून साऱ्यांनाच जादू तेरी नजर असावीच लागते. मोरूची मावशी, चार दिवस प्रेमाचे या नाटकांचे यशस्वीपणे 1000 प्रयोग केले. तर गेला माधव कुणीकडे असं विचारत अगदी सहज 1 हजार 745 प्रयोगांचा टप्पा गाठला. 'एका लग्नाची गोष्ट' म्हणाल तर साधारपणे दीड हजारावर झाली असेल. अशा या अवलियाची क्रेझ फक्त महाराष्ट्रातच नाही तर सातासमुद्रापार आहे. अमेरिका, कॅनडा इथेही प्रशांतचे अनेक चाहते आहेत. नुसतं महाराष्ट्र आणि देशातच नाही परदेशात तर नाट्यरसिक त्याच्या नाटकाची आतुरतेने वाट पाहात असतात. 

नुसते रंगमंचावरच नाही तर नाट्यकलेशी जुळलेली आपली नाळ त्यांनी कधीच तोडली नाही. बॅकस्टेज आर्टिस्ट, त्यांचे औषधोपचार, कोविड काळात त्यांना केलेले अर्थसहाय्य हे सारं वाखणण्याजोग आहे. कायम हसतमुख, नाटकाला आपला देव मानणारा, त्याच्यावर श्रद्धा असलेला असा हा अभिनेताआज 12 हजार 500 वा विक्रमी प्रयोग सादर करणार आहे. अशा या बहुरुपी अभिनेत्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा... 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी