मुंबई: रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलेला असताना दोघंही सोनम कपूरच्या लग्नाला एकत्र अवतरले. त्यानंतर तर चर्चा अधिक वाढल्या आणि सगळीकडे फक्त रणबीर-आलिया हाच विषय रंगताना दिसला. अखेर मध्यंतरी रणबीरने एका प्रसिद्ध मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या या नात्याबद्दल कबुली दिली आणि या दोघांच्या नात्यावर शिक्का मोर्तब झाला. त्यानंतर रणबीर-आलिया अनेकदा अनेक इव्हेन्ट्सना एकत्र झळकताना दिसले. हल्लीच झालेल्या एका अॅवॉर्ड्सला सुद्धा या दोघांच्या क्यूट केमिस्ट्रीने लक्ष वेधून घेतलं. अशीच त्यांची रोमॅण्टिक केमिस्ट्री नुकतीच दिसली ते अंबानींच्या अँटिलियामध्ये.
अंबानी यांच्या गणेश चतुर्थीसाठी दर वर्षी अनेक दिग्गजांची उपस्थिती लाभते. तिथेच या वर्षी बॉलिवूडचं लाडकं कपल रणबीर-आलिया एकत्र दिसले. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या यंदाच्या गणेशोत्सवा निमित्त अँटिलिया पूर्ण चमकून निघालं आहे. अंबानींच्या या गेणेशोत्सवाला रणबीर-आलियाच्या एकत्रीत हजेरीने चार चाँद नकीकच लागले. या दोघांनी फक्त एकत्र हजेरी लावली नाही तर फोटोसाठी सुद्धा एकत्र पोझ देताना दिसले. यावेळी आलिया आणि रणबीरचा रोमॅण्टिक अंदाज या सगळ्या फोटोंचा लक्षवेधी क्षण ठरला. त्यांचे हे फोटो लगेच सोशल मीडियावर काही ठिकाणी शेअर केले गेले आणि बघता-बघता या क्यूट कपलचे फोटो सोशल मीडियावर ट्रेन्ड होताना दिसले.
अंबानींच्या गणपतीच्या दर्शनासाठी आलेले रणबीर-आलिया पारंपारिक लूकमध्ये एकमेकांना छान कॉम्प्लिमेन्ट करत होते. आलियाचा ब्राईट रंगाचा ब्लाऊज, त्यावर साजेशी अशी फ्लोरल साडी आणि मोठ्या कानातल्याने तिचा लूक पूर्ण झाला होता, ज्यामध्ये ती कमालिची सुंदर दिसत होती. तर रणबीर सुद्धा ग्रे कुर्ता-लेंगा आणि त्यावर ग्रे जॅकेटमध्ये हॅण्डसम दिसत होता. दोघांनी सोलो पोझ दिले आणि मग एकत्र पण छान पोझेस दिले. या दोघांशिवाय अनेक बॉलिवूडकरांनी अंबानींच्या गणेश चतुर्थीसाठी हजेरी लावली, त्यात माधूर दिक्षीत नेने, अनिल कपूर आणि अनू मलिक यांचा पण समावेश होता.
रणबीर-आलिया यांची ही एकत्रीत उपस्थिती खूप गाजत असली तरी याची सुरुवात सोनमच्या लग्नापासून झाली होती. त्यानंतर या दोघांच्या रिलेशनच्या चर्चा वाऱ्याच्या वेगाने पसरल्या होत्या. रणबीरने एका मॅगझिनला नंतर खुलासा केला तेव्हा या चर्चांवर शिक्का मोर्तब झाला. रणबीरने तेव्हा उघडपणे काही सांगीतलं नसलं तरी तो म्हणाला होता की तो एका रिलेशनमध्ये आहे आणि ते खूप सुंदर, प्रांजळ आणि खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर आलिया देखील अनेकदा त्यांच्या या रिलेशनबद्दल अप्रत्यक्षपणे बोलताना दिसली आहे. मध्यंतरी पार पडलेल्या एका अवॉर्ड्सला आलियाला बेस्ट अॅक्ट्रेस अॅवॉर्ड जाहीर झाला होता आणि तेव्हा ती रणबीरबद्दल भरभरुन बोलली होती. तेव्हा रणबीर तिथे हजर होता आणि तेव्हाचा त्यांचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. सध्या या दोघांच्या लग्नाच्या चर्चा रंगत आहेत. बघूया याबद्दल थत्य कधी बाहेर येतं ते.