रंगभूमी सेवा पुरस्कार  रंगभूषाकार दत्तात्रय भाटकर यांना प्रदान

नमन नटवरा
Updated Nov 19, 2019 | 20:14 IST | टाइम्स नाऊ मराठी

पारिजातसाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ज्येष्ठ रंगभूषाकार दत्तात्रय भाटकर यांना पारिजात मुंबईचा "रंगभूमी सेवा पुरस्कार २०१९ " रंगभूमीवरील आघाडीचे लेखक/दिग्दर्शक/अभिनेता संतोष पवार यांच्या हस्ते प्रदान कर

rangbhumi seva purskar mumbai dattatrya bhatkar entertainment news in marathi google newsstand
रंगभूमी सेवा पुरस्कार  रंगभूषाकार दत्तात्रय भाटकर यांना प्रदान 

मुंबई : गेली 9 वर्षे सातत्याने रंगभूमी दिनाच्या औचित्याने दिला जाणारा पारिजात मुंबईचा "रंगभूमी सेवा पुरस्कार" या वर्षी हि मोठ्या दिमाखात पार पडला. जयंत सावरकर, अतुल पेठे, सुहास भालेकर, कमल शेडगे, सतीश पुळेकर, किशोर प्रधान, दादा परस नाईक ,ओमप्रकाश चव्हाण, जयंत पवार या मान्यवरानंतर यावर्षीचा हा पुरस्कार वितरित झाला आहे. 

पारिजातसाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ज्येष्ठ रंगभूषाकार दत्तात्रय भाटकर यांना पारिजात मुंबईचा "रंगभूमी सेवा पुरस्कार २०१९ " रंगभूमीवरील आघाडीचे लेखक/दिग्दर्शक/अभिनेता संतोष पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात संतोष पवार यांनी दीपप्रज्वलन करून केली. त्यानंतर आपल्या मनोगतात त्यांनी सत्कारमूर्ती दत्ता भाटकर यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला.  त्यांनतर पुरस्कार सोहळा पार पडला.  मग  रोहन धालवलकर यांनी माननीय  दत्तात्रय भाटकर यांच्याशी गप्पांचे सत्र सुरू केले.

रंगभूषा काल आणि आज, काळानुसार झालेले बदल, त्यांना एवढ्या प्रदीर्घ कालावधीत आलेले अनुभव, गंमतीदार किस्से..ह्या सर्व चर्चेने मुलखात रंगली..आणि खूप काही शिकता आला..  त्यानंतर त्यांनी अल्प वेळात एका व्यक्तीच्या रंगभूषेच्या सह्याने कायापालट कसा करू शकतो ह्याचे प्रात्यक्षिक सुद्धा सादर केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीशांत पारकर यांनी केले...

स्वप्नील पाथरे ह्यांनी रंगभूमीदिनाचे उद्देश व प्रयोजन सांगितले. कार्यक्रमाला माननिय श्रीनिवास नार्वेकर, निशांत घाटगे, शशिकांत केरकर या सारख्या अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. उपस्थित मान्यवर, सत्कार मूर्ती आणि रसिक प्रेक्षक यांच्यामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी