मुंबई: प्रसिद्ध चित्रपट (Films) आणि नाट्य (theatre) अभिनेते (actor) प्रशांत दामले (Prashant Damle) यांना कोरोनाचा संसर्ग (corona positive) झाला आहे. त्यामुळे एका लग्नाची पुढची गोष्ट (Eka Lagnachi Pudhchi Goshta) या त्यांच्या नाटकाचे मुंबईतील (Mumbai) पुनरागमनाचे प्रयोग रद्द (shows cancelled) करण्यात आले आहेत. ६१ वर्षीय प्रशांत दामले यांना डॉक्टरांनी पुढील कमीत कमी सात दिवस विलगीकरणात (isolation) राहण्याचा सल्ला दिला आहे.
लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच प्रशांत दामले यांच्या एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा प्रयोग १२ डिसेंबर रोजी पुण्यात झाला. प्रयोगानंतर प्रशांत दामले मुंबईत परतले जिथे यांना थोडी कणकण जाणवली. त्यांनी कोरोनाची चाचणी केली असता त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर डॉक्टरांनी त्यांना सात दिवस विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला आहे.
प्रशांत दामले यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर करून ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ते बुधवारपासून विलगीकरणात असल्याने बोरिवली आणि गडकरी नाट्यगृहातील त्यांच्या नाटकांचे प्रयोग रद्द करावे लागत आहेत. त्यांनी या व्हिडिओत असेही सांगितले आहे की या नाटकातील त्यांचे सर्व सहकलाकार हे कोरोना निगेटिव्ह आहेत.
कोरोनाच्या लॉकडाऊननंतर साधारण आठ महिन्यांनी नाटकाचा पडदा पुन्हा वर गेला. त्यामुळे अभिनेते प्रशांत दामले आणि अभिनेत्री कविता लाड यांनी स्वतः नाट्यगृहांमध्ये जाऊन काही काळ तिकीट खिडकी सांभाळली होती. प्रशांत दामले आणि किशोरी लाड यांनी स्वतः प्रेक्षकांचे स्वागत करून पहिल्या पाच प्रेक्षकांना तिकिटेही दिली होती.