Satya Prem Ki katha: कार्तिक आर्यनला सुपरस्टार बनवणार 'सत्य प्रेम की कथा', KRK ची भविष्यवाणी

Kartik Aryan In Satya Prem Ki Katha: कार्तिक आर्यनचा 'सत्यप्रेम की कथा' चित्रपट 29 जून रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे, कार्तिक सोबत कियारा अडवाणी देखील या चित्रपटात दिसणार आहे, आता KRK ने मोठा दावा केला आहे की हा चित्रपट कार्तिक आर्यनचे भविष्य बदलणार आहे.

Updated May 22, 2023 | 07:55 PM IST

KRK made a big claim on Karthik Aryan's Satyaprem ki katha .

कार्तिक आर्यन भावी सुपरस्टार

थोडं पण कामाचं
  • कार्तिक आर्यनच्या सत्यप्रेमच्या कथेवर KRK ने मोठा दावा केला आहे.
  • KRK ने कार्तिक आर्यनला भावी सुपरस्टार म्हंटले आहे.
  • सत्यप्रेमच्या कथेत कार्तिक आणि कियारा दिसणार आहेत.
Kartik Aryan In Satya Prem Ki Katha: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन लवकरच 'सत्यप्रेम की कथा' या आगामी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Adwani) देखील झळकणार आहे. 29 जून रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. आता या चित्रपटाबद्दल KRK ने मोठा दावा केला आहे.
KRK म्हंटले आहे की, कार्तिक आर्यनचा हा आगामी चित्रपट ब्लॉकबस्टर ठरणार आहे, यासोबतच केआरकेने कार्तिक आर्यनला पुढचा सुपरस्टार म्हणून घोषित केले आहे. आगामी काळात कार्तिक बॉलिवूडचा पुढचा सुपरहिरो सिद्ध होईल, अशी भविष्यवाणी त्याने केली आहे.

रणबीर कपूरला लगावला टोला

केआरकेने एकीकडे कार्तिक आर्यनवर स्तुतीसुमने उधळली असतानाच त्याने रणबीर कपूर (Ranbir Kapoor) ला टोला लगावला आहे. तो म्हणाला की रणबीर कपूरचा काळ आता संपला आहे, आगामी काळात फक्त कार्तिक आर्यनचेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करणार आहेत. केआरके म्हणाला, 'मला आतील बातमी मिळाली आहे. सत्यप्रेमची कथा ब्लॉकबस्टर असणार आहे. आगामी काळात कार्तिक आर्यन रणबीर कपूरसाठी मोठी स्पर्धा ठरणार आहे. त्याचा थेट अर्थ असा आहे की येत्या 10 वर्षांपर्यंत बॉलिवूडवर कार्तिक आर्यनचे राज्य असेल. सोशल मीडिया यूजर्सही केआरकेचा हा दावा बर्‍याच अंशी योग्य असल्याचे समान्य करत आहेत.

चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीससोशल मीडियावर कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा रोमँटिक चित्रपट सत्यप्रेम की कथा चा टीझर प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे. सोशल मीडिया यूजर्स कार्तिक आणि कियाराच्या केमिस्ट्रीचे कौतुक करत आहेत.
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited