43 वर्षांची अमृता सुभाष होणार आई, इन्स्टावरून दिली Good News

अवघाचि हा संसार या टीव्ही मालिकेतून प्रेक्षकांच्या घरात पोहोचलेली अभिनेत्री अमृता सुभाष 43व्या वर्षी आई होत आहे. अमृता सुभाषने इन्स्टाग्रामवरून एक फोटो पोस्ट करून ही गोड बातमी चाहत्यांना कळवली.

43 year old Amrita Subhash is going to be a mother gave Good News on Instagram
43 वर्षांची अमृता सुभाष होणार आई, इन्स्टावरून दिली Good News  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • 43 वर्षांची अमृता सुभाष होणार आई
  • इन्स्टावरून दिली Good News
  • चाहत्यांनी केले अभिनंदन

43 year old Amruta Subhash is going to be a mother gave Good News on Instagram : अवघाचि हा संसार या टीव्ही मालिकेतून प्रेक्षकांच्या घरात पोहोचलेली अभिनेत्री अमृता सुभाष 43व्या वर्षी आई होत आहे. अमृता सुभाषने इन्स्टाग्रामवरून एक फोटो पोस्ट करून ही गोड बातमी चाहत्यांना कळवली. बातमी कळताच अमृता सुभाषच्या चाहत्यांनी तिचे अभिनंदन केले. 

अभिनेत्री अमृता सुभाष हिने नाटक, टीव्ही मालिका, चित्रपट, वेब सीरिज यात अभिनय करून मनोरंजनसृष्टीत स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. बॉलिवूडमध्येही अमृता सुभाषच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. एक गुणी कलाकार अशी अमृता सुभाषची ख्याती झाली आहे. 

अभिनय क्षेत्रातील प्रगतीच्या या टप्प्यावर अमृता सुभाषने आई होण्याचा निर्णय घेतला आहे. अमृता सुभाषने इन्स्टावर तिच्या पॉझिटिव्ह आलेल्या प्रेग्नन्सी टेस्टचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोत एक बाळाचे खेळणे पण दिसत आहे. फोटोच्या माध्यमातून अमृता सुभाषने चाहत्यांना आई होत असल्याची गोड बातमी दिली आहे. 

Aai kuthe kay karate : 'आई कुठे काय करते' मालिकेत मोठा ट्विस्ट, यश-गौरीच्या नात्यात कायमचा दुरावा?

Breathe 2 Trailer Out: अभिषेक बच्चनच्या सायकोलॉजिकल थ्रीलर वेबसीरिजचा trailer Out, अ‍ॅक्शन आणि सस्पेन्सचा तडका

अमृता सुभाषच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि शेअरचा वर्षाव केला आहे. अनेकांनी अभिनेत्री अमृता सुभाष हिला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री सुकन्या मोने यांनी 'आई शप्पथ काय सांगतेस' अशी प्रतिक्रिया देत अमृता सुभाष हिला शुभेच्छा दिल्या. 

अमृता सुभाषने या पोस्टमध्ये वंडर वुमन या इन्स्टाग्राम पेजला टॅग केलं आहे. त्यामुळे ही पोस्ट अभिनेत्रीच्या आगामी प्रोजेक्टचा हा एक भागही असू शकते असं काहीजणांचे म्हणणे आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी