मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द असलेला अभिनेता सिद्धार्थ चांदेकर व अभिनेत्री मिताली मयेकर हे कपल कायम चर्चेत असतात. ते दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून ते अनेकदा त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. नुकतचा एक व्हिडिओ चांगला व्हायरल होत आहे. (A beautiful dream house decorated by Siddharth-Mithali, you will fall in love after watching this VIDEO)
अधिक वाचा : Cirkus song ‘Current Laga Re’: दीपिका-रणवीर की केमिस्ट्री चाहत्यांना लागला करंट, नवीन गाण प्रदर्शित
दोन वर्षांपूर्वीपासून रिलेशनशीपमध्ये असलेल्या सिद्धार्थ आणि मिताली यांने जानेवारी २०२१ मध्ये लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे फोटोही खूप व्हायरल झाले होते. दोघे बऱ्याच दिवसांपूर्वी नवीन घराच्या शोधात होते. गुढीपाडव्या मुहूर्तावर दोघांनी मुंबईत घर खरेदी केले.
अधिक वाचा : Akshay Kumar ला शिवाजी महाराजांच्या लूकमध्ये पाहून लोक संतापले
सिद्धार्थने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन मुंबईतील घराचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये घराच्या खिडकीतून स्वप्ननगरी मुंबईचे दर्शन होत आहे. तसेच घरातील इंटेरिअल पाहायला मिळत आहेत. तसेच त्यांच्या घराबाहेर ‘चांदेकर’ अशी नावाची पाटी लावली आहे. त्यांचा घराचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सा वर्षाव होत आहे.