Aapadi thapadi movie release: 'आपडी थापडी' सिनेमाचा ट्रेलर रिलीज, श्रेयस-मुक्ता करणार धमाल

मराठी पिक्चर बारी
Updated Sep 26, 2022 | 18:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

'Aapdi Thapdi' release date : श्रेयस तळपदे (shreyas talpade) आणि मुक्ता बर्वे (mukta barve) स्टारर 'आपडी थापडी' (Aapdi thapadi) या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 5 ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

Aapdi thapadi trailer release shreyas talpade mukta barve in lead role
श्रेयस-मुक्ताच्या 'आपडी थापडी'चा ट्रेलर रिलीज  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 'आपडी-थापडी' सिनेमाचा ट्रेलर रिलीज
  • श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे प्रमुख भूमिकेत
  • बाप आणि लेकीच्या नात्याभोवती सिनेमाची कथा फिरते

'Aapdi Thapdi' release date : श्रेयस तळपदे (shreyas talpade) आणि मुक्ता बर्वे (mukta barve) स्टारर 'आपडी थापडी' (Aapdi thapadi) या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.  5 ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. श्रेयस तळपदेने त्याच्या इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सिनेमाचा ट्रेलर शेअर केला आहे. (Aapdi thapadi trailer release shreyas talpade mukta barve in lead role)

अभिनेता श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वेची प्रमुख भूमिका या सिनेमात आहे. श्रेयस तळपदेने इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्याचं म्हटलं आहे. श्रेयस म्हणतोय, "आपल्या पिक्चररररररर… चा ट्रेलररररररररर….. 5 ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होत आहे"

अधिक वाचा : जॅकलिनला 200 कोटींच्या आर्थिक अफरातफर प्रकरणी हंगामी जामीन

सिनेमा दसऱ्याच्या मुहूर्तावर रिलीज होत या सिनेमाची टॅगलाइन आहे, "फॅमिलीचा पिक्चर, बघू फॅमिलीबरोबर. 'आपडी-थापडी' दसऱ्याच्या मुहूर्तावर ५ ऑक्टोबरपासून सिनेमागृहांत!" बाजी आणि पोस्टर बॉईजनंतर तब्बल 6 वर्षांनी श्रेयस मराठी सिनेसृष्टीत पुनरागमन करत आहे. त्याच्या चाहत्यांना त्याला पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रीनवर पाहता येणार आहे. 

श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. आपडी-थापडी हा एक लहान मुलांचा खेळ आहे. आपडी थापडी गुळाची पापडीअसं बडबडगीतंही लहानपणी आपल्यापैकी प्रत्येकाने ऐकलं असेल. बाप-लेकीभोवती सिनेमाची कथा फिरते. श्रेयस तळपदे वडिलांच्या भूमिकेत तर मुक्ता बर्वे आईच्या भूमिकेत दिसणार आहे.

अधिक वाचा : आलिया भट्टसाठी शिल्पा शेट्टीचे 'खास' सरप्राईज

या सिनेमाच्या माध्यमातून तब्बल 6 वर्षांनंतर श्रेयस तळपदे मराठी सिनेसृष्टीत पुनरागमन करत आहे. श्रेयस आणि मुक्ता बर्वेसोबतच, संदीप पाठक, नंदू माधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेमाचं दिग्दर्शन आनंद करीर यांनी केलेलं आहे. 'फॅमिलीचा चित्रपट बघा फॅमिलीसोबत'अशी या सिनेमाची टॅगलाईन  आहे. श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे या जोडीला सिल्व्हर स्क्रीनवर पाहणं ही प्रेक्षकासांठीही एक मेजवानी असेल. 


सध्या श्रेयस तळपदेची 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका स्मॉल् स्क्रीवर सुरू आहे. श्रेयसच्या या मालिकेला प्रेक्षकांकडूनही चांगली दाद मिळत आहे. मालिकेतील यशवर्धन चौधरी अर्थातच श्रेयस तळपदेच्या भूमिकेचं खूप कौतुक होत आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी