शिवाजी महाराज साकारल्यानंतर अभिनेता शंतनु मोघे आता समर्थ रामदास स्वामींच्या भूमिकेत

मराठी पिक्चर बारी
Updated Nov 06, 2019 | 19:42 IST | चित्राली चोगले

अभिनेता शंतनु मोघे अनेक भूमिकांमध्ये दिसला पण त्याची शिवाजी महाराजांची भूमिका विशेष गाजली. ही भूमिका साकारल्यानंतर आता आणखी एक अशीच मोठी भूमिका म्हणजे समर्थ रामदास स्वामिंची भूमिका शंतनुने साकारत आहे.

actor shantanu moghe opens up on playing samarth ramdas after playing shivaji maharaj
शिवाजी महाराज साकारल्यानंतर अभिनेता शंतनु मोघे आता समर्थ रामदास स्वामिंच्या भूमिकेत  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • 'श्रीराम समर्थ' सिनेमात अभिनेता शंतनु मोघेची मुख्य भूमिका
  • शिव छत्रपतींनंतर शंतनु आता दिसणार रामदास स्वामींच्या भूमिकेत
  • "मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो..." - शंतनु मोघे

मुंबई: छोट्या पडद्यावर स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेत अमोल कोल्हे यांच्या इतकाच लोकप्रिय ठरला अभिनेता शंतनु मोघे. शंतनुने साकारलेले शिवाजी महाराज अप्रतिम वाटले. शिवाजी महाराजांची भूमिका साकारायचं शिवधनुष्य उचलल्यानंतर शंतनुने आता अजून एक अशीच महत्वाची भूमिका साकारली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील अजून एक महत्त्वाचं नाव म्हणजे समर्थ रामदास स्वामी. समर्थ रामदास स्वामी यांच्यावर आधारित श्रीराम समर्थ हा मराठी सिनेमा नुकताच भेटीला आला. सिनेमात शंतनु रामदास स्वामींच्या भूमिकेत दिसला आणि त्याचं बरंच कौतुक होताना सुद्धा दिसत आहे.

शिवाजी महाराजांची भूमिका साकारल्यानंतर पुन्हा एकदा रामदाम स्वामींची एवढी मोठी भूमिका साकारताना नेमकं शंतनुला काय वाटलं याबद्दल विचारता शंतनु म्हणाला, "एक तर अभिनेता मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो की मला या दोन व्यक्तिरेखा साकारायला मिळाल्या. दोन्ही व्यक्तींनी आपला मराठी इतिहास घडवला. दोघांनीही एक विचार दिला या मातीला, एक विचार रुजवला या मातीत या विचारांवर आजही आपल्या पिढ्या जगत आहेत. त्यामुळे अशी भूमिका साकारताना एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी नक्कीच असते त्याचबरोबर क्रिएटीव्ह सॅटिसफॅक्शन ही तितकंच मोठं असतं. मी अभिनेता म्हणून आणि एक माणूस म्हणून खूप भाग्यशाली आहे की मला अशा दोन भूमिका साकारायला मिळाल्या."


 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

??JAI JAI RAGHUVEER SAMARTH?? SHRI RAM SAMARTH Releases on 01/11/2019.

A post shared by Shantanu S. Moghe (@shantanusmoghe) on

या पुढे जाऊन त्याला या भूमिकेच्या आव्हानाबद्दल विचारता शंतनु म्हणाला, "आव्हानं अशी नव्हती पण शूटिंग साइटवर म्हणाल तर खूप होती. अनेकदा अनवाणी असायचो किंवा शूट करताना पायात त्या खडका असायच्या. त्या वेळेला ते कॅरेक्टर इतकं मोठं होतं की ते करताना तुम्ही टॅन होत आहात का, तुमच्या पायाला चटके बसत आहेत का, पायात काटे रुतत आहेत का, याचा विचारंच झाला नाही. अशी भूमिका करायची संधी एकदम मोजक्या लोकांना मिळते. ही भूमिका साकारत असताना या सगळ्या गोष्टींचा विचार करणे म्हणजे खरंच चुकीचं असेल. त्यामुळे अशी आव्हानं आली ती त्या-त्या वेळी आली आणि तेव्हा तेव्हा पार सुद्धा झाली.”

त्याचसोबत शंतनुने ही भूमिका साकारायच्या आधी कधी दासबोध वाचलं आहे का? असं विचारता तो म्हणाला, “समर्थ रामदासांचं साहित्य म्हणाल तर त्यांचे साहित्य इतके मोठे आहे की सगळं वाचणं शक्य नव्हतं पण हो मी वाचलेलं आहे. या सिनेमाच्या बाबतीत माझ्या दिग्दर्शक आणि लेखक यांनी मला बरीच मदत केली. संपूर्ण साहित्य वाचन शक्य नव्हतं कारण वेळेचा अभाव होता, त्यामुळे त्यांची मला खूप मदत झाली. पण या आधी मी दासबोध वाचलेला होता. योगायोग म्हणजे मी शिवाजी महाराजांची भूमिका साकारत असताना मी दासबोध वाचला आणि तेव्हा मी विचार सुद्धा नव्हता केला की पुढे तो मला असा कामी येईल. त्या सगळ्याचा मला या सिनेमात बराच फायदा झाला.”

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी