शशांक केतकरच्या घरी गुड न्यूज 

ही पोस्ट शेअर केल्यानंतर अभिनेता जितेंद्र जोशी, अभिजीत खांडेकर, नेहा पेंडसे, रुतुजा बागवे, सायली संजीव या आणि इतर अनेक कलाकारांनी देखील शशांकला शुभेच्छा दिल्या आहेत.

Actor shashank ketkar share good news on Instagram
शशांक केतकरच्या घरी गुड न्यूज  

थोडं पण कामाचं

  • मराठी मालिका होणार सून मी या घरची मालिकेतील प्रसिद्ध मराठी अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar)याच्या घरी पाळणा हलणार असल्याची बातमी त्याने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून दिली.
  • आपली पत्नी प्रियांकाबरोबरचा हा फोटो आहे.
  • प्रियांका-शशांकच्या या फोटोवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

मुंबई : मराठी मालिका होणार सून मी या घरची मालिकेतील प्रसिद्ध मराठी अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar)याच्या घरी पाळणा हलणार असल्याची बातमी त्याने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून दिली. आपली पत्नी प्रियांकाबरोबरचा हा फोटो आहे.  प्रियांका-शशांकच्या या फोटोवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्याने ही पोस्ट शेअर केल्यानंतर अभिनेता जितेंद्र जोशी, अभिजीत खांडेकर, नेहा पेंडसे, रुतुजा बागवे, सायली संजीव या आणि इतर अनेक कलाकारांनी देखील शशांकला शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, शशांकने ख्रिसमसच्या दिवशी ही पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे या दिवसाला साजेसं असं कॅप्शनही अभिनेत्याने या पोस्टला दिलं आहे. त्याने ही पोस्ट शेअर करताना असं म्हटलं आहे की, 'आम्हाला हे माहित होतं की, सँटा येतो आणि गिफ्ट्सचा वर्षाव करतो. पण आम्हाला हे माहित नव्हतं की, आम्हालाही एक मिळेल ज्याकरता आम्ही आभारी आहोत. आम्हा तिघांकडूनही हॉलिडे सीझनच्या शुभेच्छा'.

या फोटोमध्ये प्रियांकाचं Baby Bump दिसत आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद सर्वकाही सांगून जातो आहे. शशांक त्याच्या सोशल मीडियावर नेहमी प्रियांकाबरोबरचे फोटो शेअर करत असतो. 2017 मध्ये प्रियांका आणि शशांक यांनी विवाह केला होता. याआधीही या कपलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, दरम्यान हा फोटो देखील अनेक चाहत्यांनी शेअर केला आहे. शशांकचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी त्याचे होणार सून मी त्या घरीच मालिकेतील तेजश्री प्रधान हिच्या झाले होते. नंतर त्यांच्या घटस्फोट झाला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी