अभिनेत्री हेमांगी कवीचं मुंबईतील नव्या घराचं स्वप्न पूर्ण

अभिनेत्री हेमांगी कवीचं स्वत:च्या घराचं स्वप्न पूर्ण झालं आहे.  मायानगरी मुंबईतील बोरिवली येथे  तिने दिवाळीत नव्या घरात प्रवेश केला आहे.

actress hemangi kavi-dhumal purchase new house in mumbai
अभिनेत्री हेमांगी कवीचं मुंबईतील नव्या घराचं स्वप्न पूर्ण  |  फोटो सौजन्य: फेसबुक

थोडं पण कामाचं

  • अभिनेत्री हेमांगी कवीचं स्वत:च्या घराचं स्वप्न पूर्ण झालं आहे.  
  • मायानगरी मुंबईतील बोरिवली येथे  तिने दिवाळीत नव्या घरात प्रवेश केला आहे.
  • मग 'म्हाडा' मध्ये सलग ८ वर्ष प्रयत्न केल्यावर एकदाची २०१६ मध्ये मला लॉटरी लागली

मुंबई :  अभिनेत्री हेमांगी कवीचं स्वत:च्या घराचं स्वप्न पूर्ण झालं आहे.  मायानगरी मुंबईतील बोरिवली येथे  तिने दिवाळीत नव्या घरात प्रवेश केला आहे. सोशल मीडियावर घराचे अनेक फोटो टाकून तिने ही आनंदाची बातमी चाहत्यांना सांगितली आहे. 

मुंबई सारख्या ठिकाणी घर घेणं आमच्या सारख्यांना अशक्य आहे, हे खूप आधीच आमच्या लक्षात आलं होतं. म्हणून मग 'म्हाडा' मध्ये सलग ८ वर्ष प्रयत्न केल्यावर एकदाची २०१६ मध्ये मला लॉटरी लागली आणि बोरीवलीत आम्हांला घर लाभलं. तोपर्यंत आम्ही भाडेतत्त्वावर कधी दादर तर कधी दहिसर मध्ये रहायलो.

 

हमारा अपना और पहला घर! #home #newhouse #diwali2020

Posted by Hemangi Kavi-Dhumal on Monday, November 16, 2020


पण प्रत्यक्षात घर हातात यायला नोव्हेंबर २०१९ उजाडलं.  घराचा ताबा आणि सर्व तांत्रिक सोपस्कार आटपून आणि आम्हांला हवी तशी सजावट करून घेऊन फेब्रुवारीमध्ये आम्ही आमच्या हक्काच्या घरात 'गृहप्रवेश' केला! , असं तिने इंस्टाग्रामवरील पोस्टवर लिहिलं आहे.

त्यावेळी आम्ही दोघे ही मालिकांमध्ये प्रचंड व्यस्त होतो आणि नंतर मार्च मध्ये कोरोनामुळे आम्ही गावी निघून गेलो.  ४ महिने साताऱ्याला राहून आम्ही जूनमध्ये आमच्या या नवीन घरात परतलो. पण मग जून पासूनच पुन्हा कामं सुरू झाली आणि आम्ही वेगवेगळ्या शहरात शूटिंगसाठी निघून गेलो. त्यामुळे खूप काळ आम्हांला आमच्या या नवीन घरात राहायलाच मिळालं नाही किंवा कुठलेच सण नीटसे साजरे करता आलेच नाहीत.

पण मग यावेळी मात्र काहीही झालं, कितीही बिझी असलो तरी 'दिवाळी' सुट्टी घेऊन आपल्या या पहिल्यावहिल्या, नवीन, हक्काच्या घरात साजरी करायचीच असं ठरवून टाकलं.

So, यंदाची आमची दिवाळी, आमचा पाडवा या नवीन, हक्काच्या घरात साजरा करतोय! तुमचे आशीर्वाद असू द्यात!, या शब्दाच तिने आपल्या घराबद्दल असलेल्या भावना मोकळ्या केल्या आहे.

यावेळी तीने पाडव्याच्या आणि दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी