अभिनेत्री तेजस्विनी पंडीतच्या अनोख्या नवरात्री फोटोशूटची सर्वत्र चर्चा

मराठी पिक्चर बारी
Updated Oct 07, 2019 | 18:45 IST | चित्राली चोगले

अभिनेत्री तेजस्विनी पंडीतचं नवरात्री निमित्त केलेलं फोटोशूट भलतंच गाजतेय. तिचं प्रत्येक रुप व त्याचसोबत हाताळलेला गहन विषय प्रचंड लोकप्रिय ठरतोय. आता तिची षष्ठी, सप्तमी, अष्टमी आणि नवमीची रुपं देखील उत्तम आहेत.

actress tejaswini pandit’s navratri photoshoot is a hit on social media
अभिनेत्री तेजस्विनी पंडीतच्या अनोख्या नवरात्री फोटोशूटची षष्ठी, सप्तमी, अष्टमी आणि नवमीची रुपं देखील लोकप्रिय 

थोडं पण कामाचं

  • तेजस्विनी पंडीतचं अनोखं नवरात्री स्पेशल फोटोशूट
  • तेजस्विनीची षष्ठी, सप्तमी, अष्टमी आणि नवमीची रुपं पाहा
  • प्रत्येक रुपासोबत गहन विषयावर केलं भाष्य

मुंबई: अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने गेल्या वर्षीप्रमाणे यंदा देखील नवरात्री निमित्त खास फोटोशूट केलं आहे. तिचं हे अनोखं फोटोशूट अनेक कारणांसाठी फारंच गाजत आहे. तिची आगळी-वेगळी देवीची रुपं, त्यातले तिचे लूक आणि त्याचसोबत हाताळलेले गहन विषय, या सगळ्यामुळे हे फोटोशूट सोशल मीडियावर फारंच लोकप्रिय ठरलं आहे. तिच्या प्रत्येक लूकसाठी ती काहीतरी नवीन करत आहे. त्यामुळे त्याबद्दल असलेली उत्सुकता देखील खूप आहे. आज नवमी असल्यामुळे तिचा यंदाचा शेवटचा लूक आता रिव्हील झाला आहे. तिच्या पहिल्या रुपांप्रमाणेच तिचं षष्ठी, सप्तमी, अष्टमी आणि आजचं नवमीचं रुप सगळ्यांना खूप आवडलं आहे. एक नजर टाकूयात तिच्या या रुपांवर आणि त्यात कोणते विषय हाताळले गेले आहेत त्यावर.

षष्ठी " तुळजाभवानी"

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

षष्ठी " तुळजाभवानी" . . जिथे सगळीकडे महापूर थैमान घालत होता ...तिथे पावसाच्या एका थेंबाची वाट पाहत होते मी जिथे एकीकडे बळीराजाने वाहून जाणारी शेतं पाहिली... तिथे भेगाळलेल्या भूमीवर फासावर लटकलेल्या भूमिपुत्रांची माता मी जिथे मुकी लेकरं पाण्यात वाहून जात होती... तिथे चारा छावणीत भुकेलेली माझी लेकरं पाहिलेली मी जिथे पाण्यानी संसार उध्वस्त झाले... तिथे पाण्याअभावी रिकामी होत चाललेली गावे भोगलेली मी पाण्याने वाट्टोळं नाही झाले म्हणून सुखावू मी ? की करपणाऱ्या भविष्याची काळजी करू मी.... या प्रश्नांत अडकलेली मी ! . . Concept & Director : @dhairya_insta_ Photographer : @bharatpawarphotography Digital art by : @amol.hirawadekar @imvishalshinde @thenameisabhishekk @vainateymg Asst. Dir : @shraddha_kakade Jewellery by : @pngadgilandsons Makeup : @vinodsarode Hair : @sheetalpalsande Styled by : @stylistnakshu @saniyacool @pottering.vels Costumes By : @official_dadfashionstudio PR & Social Media By : @dreamers_pr Special Thanks : @rjadhishh #navratri #tejaswinipandit

A post shared by Tejaswini Pandit (@tejaswini_pandit) on

जिथे सगळीकडे महापूर थैमान घालत होता. तिथे पावसाच्या एका थेंबाची वाट पाहत होते मी जिथे एकीकडे बळीराजाने वाहून जाणारी शेतं पाहिली. तिथे भेगाळलेल्या भूमीवर फासावर लटकलेल्या भूमिपुत्रांची माता मी जिथे मुकी लेकरं पाण्यात वाहून जात होती. तिथे चारा छावणीत भुकेलेली माझी लेकरं पाहिलेली मी जिथे पाण्यानी संसार उध्वस्त झाले. तिथे पाण्या अभावी रिकामी होत चाललेली गावे भोगलेली मी पाण्याने वाट्टोळं नाही झाले म्हणून सुखावू मी? की करपणाऱ्या भविष्याची काळजी करू मी या प्रश्नांत अडकलेली मी!

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

सप्तमी " मुंबादेवी" . . देशाची आर्थिक राजधानी असा माझा लौकिक ....देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रत्येकाला मी माझ्यात सामावून घेतले.....प्रत्येकाच्या प्रगतीसाठी हृदयाप्रमाणे अखंडित धड्कत राहणारी मी !!! जीवनाचा -प्रगतीचा वेग वाढवणाऱ्या रस्त्याचं जाळ तू इथे विणलं नसतंच तरच नवल होतं........पण त्यावरील अगणित खड्डे? ..ते मात्र जीवघेणे ठरतायेत....सगळीकडे फक्त ट्राफिक आणि ट्राफिक....हि कसली प्रगती? हरवलेय मी या कोलाहलात ....मला भक्तांची आर्जवे ऐकू येत नाहीत की समुद्राची गाज ....अहोरात्र ऐकू येतो तो कर्णकर्कश्श होर्न आणि गोंगाट... हि माझी नगरी .....मी मुंबा आणि हि माझी मुंबा पुरी ..मुंबई!!! . . Concept & Director : @dhairya_insta_ Photographer : @bharatpawarphotography Digital art by : @amol.hirawadekar @imvishalshinde @thenameisabhishekk Asst. Dir : @shraddha_kakade Jewellery by : @pngadgilandsons Makeup : @vinodsarode Hair : @sheetalpalsande Styled by : @stylistnakshu @@saniyacool @pottering.vels Costumes By : @official_dadfashionstudio PR & Social Media By : @dreamers_pr Special Thanks : @rjadhishh @@jyotsnapethkar #mumbai #mumbaitraffic #mumbadevi #navratri #tejaswinipandit

A post shared by Tejaswini Pandit (@tejaswini_pandit) on

सप्तमी " मुंबादेवी"

देशाची आर्थिक राजधानी असा माझा लौकिक... देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रत्येकाला मी माझ्यात सामावून घेतले. प्रत्येकाच्या प्रगतीसाठी हृदयाप्रमाणे अखंडित धडकत राहणारी मी!!! जीवनाचा -प्रगतीचा वेग वाढवणाऱ्या रस्त्याचं जाळ तू इथे विणलं नसतंच तरच नवल होतं. पण त्यावरील अगणित खड्डे? ते मात्र जीवघेणे ठरतायेत. सगळीकडे फक्त ट्रॅफिक आणि ट्रॅफिक. ही कसली प्रगती? हरवलेय मी या कोलाहलात. मला भक्तांची आर्जवे ऐकू येत नाहीत की समुद्राची गाज. अहोरात्र ऐकू येतो तो कर्णकर्कश्श होर्न आणि गोंगाट. ही माझी नगरी... मी मुंबा आणि ही माझी मुंबा पुरी... मुंबई!!!

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

अष्टमी "गावदेवी" . . थांब घाव घालू नकोस......याच्या मुळावर घालू नकोस ....समस्येच्या मुळावर घाल.... इतके रस्ते इतकी वाहन असूनही तुला ‘वेग’ कमीच वाटतोय का? तुझा प्रवास सुखकर आणि वेगाने होण्यासाठी तू आज यांचा प्रवास संपवतोयस? किती हतबल आहे मी.....या संपत्तीला कसे वाचवू? किती जीव वैविध्याने सजवली होती मी हि वसुंधरा ...यावर हक्क फक्त तुमचाच कधी झाला? ....जंगलं साफ करा वस्त्या वाढवा....रस्ते बनवा...सोय फक्त स्वत:चीच बघा ....इतरांचे काय? ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ हे फक्त शोभेसाठीच न? Carbon dioxide कमी करणार असे सांगून स्वत: ची समजूत काढतोयेस का? मग निसर्गाने हे हिरवे नवल का रचले ? ते फक्त Carbon dioxide कमी करत नाहीत तर तुला ‘प्राणवायूचे’ वरदानही देतात.... अनेकांचा आश्रय आज निर्दयतेने कापून काढला जातोय....तुमचा प्रवास सोपा व्हावा म्हणून तुम्ही कुणाचा तरी प्रवास संपवत आहात. लक्षात ठेवा हा प्रवास आज त्यांचा संपतोय आणि कालांतराने तुमचा देखील.... . . Concept & Director : @dhairya_insta_ Photographer : @bharatpawarphotography Digital art by : @amol.hirawadekar @imvishalshinde @thenameisabhishekk Asst. Dir : @shraddha_kakade Jewellery by : @pngadgilandsons Makeup : @vinodsarode Hair : @sheetalpalsande Styled by : @stylistnakshu @saniyacool @pottering.vels Costumes By : @official_dadfashionstudio PR & Social Media By : @dreamers_pr Special thanks @jyotsnapethkar and @rjadhishh #aarey #saveaarey #gaodevi #navratri #tejaswinipandit

A post shared by Tejaswini Pandit (@tejaswini_pandit) on

अष्टमी "गावदेवी"

थांब घाव घालू नकोस. याच्या मुळावर घालू नकोस... समस्येच्या मुळावर घाल...

इतके रस्ते इतकी वाहन असूनही तुला ‘वेग’ कमीच वाटतोय का? तुझा प्रवास सुखकर आणि वेगाने होण्यासाठी तू आज यांचा प्रवास संपवतोयस? किती हतबल आहे मी. या संपत्तीला कसे वाचवू? किती जीव वैविध्याने सजवली होती मी हि वसुंधरा... यावर हक्क फक्त तुमचाच कधी झाला? जंगलं साफ करा वस्त्या वाढवा... रस्ते बनवा... सोय फक्त स्वत:चीच बघा... इतरांचे काय? ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ हे फक्त शोभेसाठीच न? Carbon dioxide कमी करणार असे सांगून स्वत:ची समजूत काढतोयेस का? मग निसर्गाने हे हिरवे नवल का रचले? ते फक्त Carbon dioxide कमी करत नाहीत तर तुला ‘प्राणवायूचे’ वरदानही देतात. अनेकांचा आश्रय आज निर्दयतेने कापून काढला जातोय. तुमचा प्रवास सोपा व्हावा म्हणून तुम्ही कुणाचा तरी प्रवास संपवत आहात. लक्षात ठेवा हा प्रवास आज त्यांचा संपतोय आणि कालांतराने तुमचा देखील.

 

नवमी " पृथ्वी माता "

पृथ्वी मी अदिती मी

आदि मी अनंत मी...

तू जाळले मला जरी

कृपाच वर्षवेन मी...

घुसमटला कंठ माझा तरी

दान प्राणाचेच देईन मी...

ज्ञान शिडे उभारुनी जग जिंकण्याचा खेळ तुझा चालला

पण उत्पत्ती स्थिती प्रलय हा अंतिम धर्म आहे आपुला

या धर्म क्षेत्री सदा अशीच अचल राहीन मी...

तू जाळले मला जरी कृपाच वर्षवेन मी

तू जाळले मला जरी कृपाच वर्षवेन मी !!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...