अभिनेत्री वर्षा उसगांवकरला (Varsha Usgaonkar) पितृशोक 

actress varsha usgavkars father passes away : अच्युत उसगांवकर हे गोव्यातील प्रसिद्ध बीच असलेल्या मिरामार येथे राहत होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते वृद्धापकाळाने आजारी होती

Former Goa Minister Achyut Usgaonkar Dies at 92 Due to Age-related Ailments
अभिनेत्री वर्षा उसगांवकरला (Varsha Usgaonkar) पितृशोक  

थोडं पण कामाचं

  • मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या वडिलांचे निधन
  • गोवा मुक्ती संग्रामानंतर सत्तेवर आलेल्या स्वर्गिय भाऊसाहेब बांदोडकर यांच्या मंत्रिमंडळात अच्युत उसगांवकर यांनी मंत्री म्हणून काम केले होते. 
  • अच्युत उसगांवकर हे गोव्यातील प्रसिद्ध बीच असलेल्या मिरामार येथे राहत होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते वृद्धापकाळाने आजारी होती

पणजी :   आज काळा मंगळवार ठरला आहे. विविध ठिकाणाहून आज निधनाच्या बातम्या समोर आल्या.  या दिवशी दोन पत्रकार, एक खासदार आणि एका अभिनेत्रीच्या पिता आणि माजी मंत्री यांचे निधन झाले आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचे वडील आणि गोव्याचा माजी मंत्री अच्युत उसगांवकर (  Achyut Kashinath Sinai Usgaonkar) यांचे आज गोव्यात (Goa) निधन झाले आहे. ते ९२ वर्षांचे होते. गोवा मुक्ती संग्रामानंतर सत्तेवर आलेल्या स्वर्गिय भाऊसाहेब बांदोडकर यांच्या मंत्रिमंडळात अच्युत उसगांवकर यांनी मंत्री म्हणून काम केले होते. 


अच्युत उसगांवकर हे गोव्यातील प्रसिद्ध बीच असलेल्या मिरामार येथे राहत होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते वृद्धापकाळाने आजारी होती. त्यांची प्राणज्योत मंगळवारी मालवली. त्यांच्या निधनाने गोव्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोर्तुगीजांच्या तावडीतून गोव्याची १९६२ मध्ये मुक्ती संग्रामाच्या माध्यमातून मुक्तता झाली. त्यानंतर गोव्यावर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची सत्ता आली. या पक्षाने सुमारे सतरा वर्ष गोव्यावर सत्ता गाजवली. 

अच्युत उसगांवकर हे मगो पक्षाचे नेते होते. सत्तरच्या दशकात गोव्यात आमदार आणि मंत्री म्हणून उसगांवकरांनी बऱ्याच प्रमाणात समाजपयोगी आमि विकासाची कामे केली. ते सुरूवातीला भाऊसाहेब बांदोडकर आणि त्यांची कन्या स्वर्गीय शशिकला काकोडकर यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून उसगांवकरांना मानाचे स्थान होते.  बांदोडकर यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्यापूर्वी उसगांवकर हे गोव्या विधानसभेचे उपसभापती होते. 

उसगांवकर यांचे निधन गोव्यातील गोवा मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात आज सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी निधन झाले, त्यांच जावई दिनार तारकर यांनी ही माहिती पीटीआयला दिली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी