[VIDEO] सई ताम्हणकर आणि अमेय वाघ या हटके जोडीच्या गर्लफ्रेंड सिनेमाचा ट्रेलर पाहिलात का?

मराठी पिक्चर बारी
Updated Jul 09, 2019 | 14:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

Girlfriend Marathi Movie Trailer: अमेय वाघ आणि सई ताम्हणकर या हटके जोडीचा गर्लफ्रेंड सिनेमा लवकरच भेटीला येणार आहे. नुकताच सिनेमाचा ट्रेलर आणि गाणी लॉन्च केली गेली. सिनेमाच्या धमाल ट्रेलरची झलक पाहिलीत का?

Amey Wagh and Sai tamhankar’s Girlfriend Marathi movie trailer release
सई ताम्हणकर आणि अमेय वाघ या नवीन जोडीचा गर्लफ्रेंड सिनेमाचा ट्रेलर पाहिलात का?  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • अमेय वाघ आणि सई ताम्हणकर या हटके जोडीच्या गर्लफ्रेंड सिनेमाचा ट्रेलर भेटीला
  • रसिका सुनील आणि इशा केसकर या दोन 'शनाया' सिनेमात एकत्र
  • तरूणाईला आवडतील अशी फ्रेश गाणी सुद्धा रिलीज

मुंबई: गर्लफ्रेंड हा विषय अनेक तरूणांच्या तारूण्याच्या जवळचा विषय असतो अगदी नाजूक तरीही तितकाच स्पेशल. आजकाल जिथे प्रत्येक तरूणाच्या आयुष्यात एखादी तरी गर्लफ्रेंड असणं हे एक ट्रेन्ड झालं असलं तरी एखाद्या तरूणाला जर गर्लफ्रेंड नसेल तर? तर तेवढासा मोठा प्रॉब्लेम होईल असं वाटत नाही, हो की नाही? असा विचार करत असाल तर मग तुम्ही या नचिकेत प्रधानला नक्कीच भेटला नाही आहात. अहो नचिकेत प्रधान म्हणजे गर्लफ्रेंड सिनेमातला नायक. म्हणजे सगळ्यांचा लाडका अमेय वाघ. तर हा नचिकेत गर्लफ्रेंड नसल्याने बराच वैतागला आहे. त्यात त्याचा मित्रपरिवार ही त्याला चिडवायला लागलाय. त्याच्या आईला तर वाटतंय त्याला मुलं आवडतात. या नचिकेतची गोष्टीची झलक पाहायची असेल तर नुकताच रिलीज झालेला गर्लफ्रेंड सिनेमाचा ट्रेलर नक्की पाहा.

गर्लफ्रेंड सिनेमाचा ट्रेलर आणि म्युझिक लॉन्च सोहळा नुकताच दिमाखदार पद्धतीत मुंबईत पार पडला ज्याला सिनेमाची संपूर्ण टीम हजर होती. आता सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला गेलाय.  या नचिकेतच्या आयुष्यात येणारी अलिशा नेरूळकर म्हणजेच सई ताम्हणकर सुद्धा या ट्रेलरमध्ये दिसून येते.  या नचिकेत-अलिशाची टर्नवाली ट्विस्टवाली लव्ह स्टोरी कशी आणि कधी सुरू होते आणि मग त्यात काय चढ-उतार येतात त्या भवती गर्लफ्रेंड सिनेमा रेखाटलेला आहे. सिनेमात अमेय आणि सईच्या जोडीला यतिन कार्येकर, कविता लाड, रसिका सुनील, इशा केसकर आणि सागर देशमुख अशा कसलेल्या कलाकारांची फौज महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसेल.

 

 

सिनेमाची प्रमोशन कॅम्पेन प्रचंड गाजली होती तसंच सिनेमातलं ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड…’ हे गाणं सुद्धा सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तशीच सिनेमातली इतर गाणी ‘लव्ह स्टोरी’ आणि ‘कोडे सोप्पे थोडे’ फार उत्तम झाली असून सिनेमाची उत्कंठा वाढवल्या शिवाय राहत नाहीत. ह्यूज प्रॉडक्शन्स आणि प्रतिसाद प्रॉडक्शन्स प्रस्तुत या सिनेमाला ऋषीकेश-सौरभ-जसराज यांचे संगीत लाभलं आहे. गीतकार क्षितीज पटवर्धन यांच्या गीतांना शाल्मली खोलगडे, श्रुती आठवले, जसराज जोशी यांच्या आवाजांनी वेगळीच बहार आणली आहे. शिवाय सिनेमाच्या ट्रेलरने सुद्धा या तरूणाईला आवडेल अशा सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहचवली आहे.

 

सध्या सिनेमाची गाणी आणि ट्रेलरला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय. त्याचसोबत सई-अमेय या हटके आणि नवीन जोडीबद्दलची उत्सुकता सुद्धा अनेकांना आहेच. शिवाय सिनेमाचा लूक आणि कन्सेप्ट बरीच फ्रेश आणि नवीन असल्याने सिनेमाबद्दल कुतुहल निर्माण झाल्या शिवाय राहत नाही. तर या लाजाळू नचिकेत आणि त्याच्या आयुष्यात येणाऱ्या आलिशा या त्याच्या गर्लफ्रेंडची लव्ह स्टोरी आणि पुढे होणाऱ्या गंमती-जंमती घेऊन एक धमाल आणि मनोरंजनाची सफर घेऊन उपेंद्र सिधये द्वारा लिखित-दिग्दर्शित गर्लफ्रेंड हा सिनेमा येत्या २६ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
[VIDEO] सई ताम्हणकर आणि अमेय वाघ या हटके जोडीच्या गर्लफ्रेंड सिनेमाचा ट्रेलर पाहिलात का? Description: Girlfriend Marathi Movie Trailer: अमेय वाघ आणि सई ताम्हणकर या हटके जोडीचा गर्लफ्रेंड सिनेमा लवकरच भेटीला येणार आहे. नुकताच सिनेमाचा ट्रेलर आणि गाणी लॉन्च केली गेली. सिनेमाच्या धमाल ट्रेलरची झलक पाहिलीत का?
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles