अमेय वाघ-सई ताम्हणकर स्टारर गर्लफ्रेन्ड सिनेमाचं धमाल टायटल साँग पाहिलंत का?

मराठी पिक्चर बारी
Updated Jun 18, 2019 | 16:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

Girlfriend Marathi Movie title song released: अमेय वाघ-सई ताम्हणकर या जोडीच्या गर्लफ्रेंड सिनेमाची खूप उत्सुकता आहे. ही अधिक ताणण्यासाठी सिनेमाचं टायटल साँग भेटीला आलं आहे आणि सध्या ते धुमाकूळ घालाताना दिसतंय.

Amey Wagh Sai Tamhankar starrer Girlfriend first song Nachya got a girlfriend released
अमेय वाघ-सई ताम्हणकर स्टार्रर गर्लफ्रेन्ड सिनेमाचं धमाल टायटल साँग पाहिलंत का? 

मंबई: अभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी त्याच्या सोशल मीडियावर काही अनोख्या पोस्ट शेअर करायला सुरुवात केली होती. या पोस्टवर भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसला. काही दिवसांनी सोशल मीडियावर बराच गाजा वाजा झाल्यावर अखेर अमेयने त्याच्या या पोस्टमागचं खरं कारण उघड केलं आणि ते होतं गर्लफ्रेंड. नाही नाही अमेयची गर्लफ्रेंड नाही तर, त्याचा आगामी सिनेमा गर्लफ्रेंड. या सिनेमाचं प्रमोशन अगदी जोरदार सुरु झालं त्याचप्रमाणे सिनेमाच्या फिमेल लीडला सुद्धा असंच सोशल मीडियावर एक धमाल प्रमोशन करुन रिव्हील केलं गेलं आणि ती होती सई ताम्हणकर. आता या अमेय म्हणजे सिनेमातल्या नच्याला गर्लफ्रेन्ड सापडल्याचा आनंद व्यक्त करणारं सिनेमाचं टायटल साँग नच्या गॉट अ गर्लफ्रेन्ड भेटीला आलं आहे.

तर अखेर नचिकेतच्या प्रयत्नाला यश आले असून आजवर इंट्रोव्हर्ट असणारा हा मुलगा “बघतोस काय रागानं...डाव टाकलाय वाघानं, एका फटक्यात केला विषय एंड” असं म्हणत ‘गर्लफ्रेंड’ मिळाल्याचा आनंद अतिशय हटके अंदाजात आपल्या घरापासून ऑफिसपर्यंत साजरा करताना दिसतोय. तो आनंद तुम्हाला पहायाचा असेल तर सिनेमाचं नुकतंच रिलीज झालेलं ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ हे गाणं नक्की पाहा. सध्या हे गाणं सोशल मीडियावर बराच धुमाकूळ घालताना दिसत आहे.

 

 

हे गाणं जसराज जोशी याने गायले असून याचे गीतकार क्षितीज पटवर्धन आहेत, तर संगीतकार हृषिकेश–सौरभ-जसराज यांनी अतिशय हटके अंदाजात हे संगीतबद्ध केले आहे. नचिकेतला गर्लफ्रेंड मिळाल्याचा आनंद त्याच्या कुटुंबीयांना झाला असून या गाण्यामध्ये यतीन कार्येकर, कविता लाड हे त्याचे आई – बाबा त्याच्या आनंदात सहभागी होत नाचताना दिसतात. तसेच नच्याला ‘गर्लफ्रेंड’ मिळाली ही ब्रेकिंग न्यूज ठरली असून त्याच्या या यशाचा आनंद त्याच्या ऑफिसमधील सहकारी सागर देशमुख, रसिका सुनील, सुयोग गोऱ्हे यांना सुद्धा झाल्याचे गाण्यात दिसत आहे. एकंदरीत ऑफिस, घर, क्लब अशा सार्वजनिक ठिकाणी जाऊन हा नच्या आपल्याला गर्लफ्रेंड मिळाल्याचा आनंद व्यक्त करतो. विशेष म्हणजे गर्लफ्रेंड मिळाल्याने आपल्यात काहीतरी सुपर पॉवर आल्याची भावना त्याच्या मनात आल्याचे दिसते. अमेय वाघ आणि सई ताम्हणकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला गर्लफ्रेंड हा सिनेमा येत्या २६ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
अमेय वाघ-सई ताम्हणकर स्टारर गर्लफ्रेन्ड सिनेमाचं धमाल टायटल साँग पाहिलंत का? Description: Girlfriend Marathi Movie title song released: अमेय वाघ-सई ताम्हणकर या जोडीच्या गर्लफ्रेंड सिनेमाची खूप उत्सुकता आहे. ही अधिक ताणण्यासाठी सिनेमाचं टायटल साँग भेटीला आलं आहे आणि सध्या ते धुमाकूळ घालाताना दिसतंय.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola