Marathi New Film Autograph: लवकरच मराठीत येतेय जपून ठेवावी अशी Lovs Story, 'ही' खास जोडी रंगवणार स्पेशल प्रेमकहाणी

मराठी पिक्चर बारी
Updated Jul 21, 2022 | 15:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

Marathi New Film Autograph Teaser: अमृता खानविलकर (Amruta khanvilkar)आणि अंकुश चौधरी (Ankush Chaudhri ) लवकरच एक नवीकोरी मराठी लव्हस्टोरी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सतिश राजवाडे दिग्दर्शित 'ऑटोग्राफ' या सिनेमाचा टीझर ( Marathi New Film Autograph) लॉन्च करण्यात आला आहे. 30 डिसेंबर 2022 ला हा सिनेमा रिलीज होणार आहे. 'ऑटोग्राफ' सिनेमाच्या टीझरने (Marathi New Film Autograph Teaser) प्रेक्षकांची उत्सुकता आधीच वाढवलेली आहे.

Marathi New Film Autograph Teaser
मराठी सिनेमा'ऑटोग्राफ'चा टीझर लॉन्च  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अमृता आणि अंकुश चौधरीचा नवा मराठी सिनेमा 'ऑटोग्राफ'
  • सतीश राजवाडे दिग्दर्शित 'ऑटोग्राफ' सिनेमाचा टीझर लॉन्च
  • चंद्रमुखीनंतर आता अमृता सांगणार उलगडणार लव्ह स्टोरी

Marathi New Film Autograph Teaser: अमृता खानविलकर (Amruta khanvilkar) आणि अंकुश चौधरी (Ankush Chaudhri ) लवकरच एक नवीकोरी
मराठी लव्हस्टोरी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सतिश राजवाडे (Satish Rajwade ) दिग्दर्शित 'ऑटोग्राफ' या सिनेमाचा टीझर लॉन्च करण्यात आला आहे. 30 डिसेंबर 2022 ला हा सिनेमा रिलीज होणार आहे. 'ती सध्या काय करते' या सिनेमानंतर पुन्हा एकदा अंकुश चौधरी आणि सतिश राजवाडे एकत्र काम करणार आहेत. (Amruta Khanvilkar and Ankush chaudhari new marathi film love story Autograph teaser launch directed by Satish Rajwade)


पाऊस पडतोय, आणि बँकराऊंडला ला अंकुश चौधरी म्हणतोय, 'काहीही कारण नसताना, कोणतीही ओळख नसताना, काही माणसं भेटतात आणि त्यांची आठवण आपल्या मनावर कायमची कोरून जातात. ती माणसं, ते नाव, त्यांचा तो ठसा कायम जपून ठेवावासा वाटतो, एखाद्या ऑटोग्राफसारखा. होय, कारण आपण ऑटोग्राफ मागून घेतो, जपून ठेवण्यासाठी कायमचा'. अशी ही हळुवार, नाजूक अशी प्रेमकहाणी असणार हे टीझरवरून लक्षात येतय. 

अधिक वाचा : 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीचं राहुल द्रविडसोबत आहे खास नातं

लव्ह स्टोरी हाताळण्यात हातखंडा असलेला मराठीतला आघाडीचा दिग्दर्शक सतीश राजवाडे (Satish Rajwade ) पुन्हा एकदा एक नवी कोरी लव्ह स्टोरी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मुंबई-पुणे-मुंबई, प्रेमाची गोष्ट, ती सध्या काय करते या लव्ह स्टोरीजनंतर आता 'ऑटोग्राफ' या सिनेमातून जपून ठेवावी अशी लव्ह स्टोरी उलगडायला सतिश राजवाडे सज्ज झालेला आहे. 'जपून ठेवावी अशी लव्हस्टोरी' ही सिनेमाची कॅचलाईन. 

अंकुश चौधरी (Ankush Chaudhri ) आणि अमृता खानविलकर (Amruta khanvilkar) ही जोडी ही आगळीवेगळी लव्ह स्टोरी उलगडणार आहेत.ती सध्या काय करते या सिनेमानंतर पुन्हा एकदा अंकुश आणि सतिश राजवाडे एकत्र काम करणार आहेत. तर चंद्रमुखी या सिनेमात कलावंतीणीची भूमिका साकारल्यानंतर आता अमृता खानविलकर एक वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या सिनेमाचा टीझर अमृता खानविलकरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेला आहे. 

अधिक वाचा : जगातील सर्वात प्रभावशाली पासपोर्ट कुणाचा?

अमृता खानविलकर ही मराठीतील टॉपची अभिनेत्री आहे. चंद्रमुखी या सिनेमात अमृताने साकारलेल्या चंद्राचं साऱ्यांनीच कौतुक केलं. नुकताचअमृताने नच बलिए या डान्स रिएलिटी शोमधील एक जुना व्हिडिओ शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Marathi TRP (@trpmarathi)

अमृता (Amruta khanvilkar)  आणि हिमांशु ( Himanshu  malhotra ) नच बलिए सीझन 7 चे महाविजेते होते. या शोदरम्यान अमृताच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टीसुद्धा समोर आल्या होत्या. उत्कृष्ट अभिनय आणि उत्तम डान्सने अमृताने साऱ्यांनाच आपलंस केलं. विनर घोषित होताच अमृता रडते आणि आपला नवरा हिमांशु मल्होत्राला मिठी मारत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.  अमृतासाठी हा क्षण कधीही न विसरता येण्यासारखाच असल्याचं तिने म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी