Marathi Celebrity News: "तुला खूप काही सांगायचं होतं पण राहूनच गेलं", असं म्हणतेय 'ही' मराठमोळी अभिनेत्री

मराठी पिक्चर बारी
Updated Aug 15, 2022 | 20:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

Marathi Celebrity News: अमृता खानविलकर ( Amruta Khanvilkar )हे मराठी सिनेसृष्टीत गाजत असलेलं एक नाव. सध्या ती करिअरमध्ये उंचच उंच भरारी घेत आहे. मात्र, तिच्या खासगी आयुष्यात एक दु:खद घटना घडलीय.

Amruta Khanvilkar special post for lost of special person in her life
'या' अभिनेत्रीच्या आयुष्यात घडलीय दु:खद घटना  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अमृता खानविलकरच्या मावशीचं निधन
  • अमृता आणि मावशीचं अनोख नातं
  • इंस्टावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली बातमी

Amruta Khanvilkar : चंद्रमुखी सिनेमामुळे अमृता खानविलकर ( Amruta Khanvilkar ) खूपच चर्चेत आली आहे. सिनेमाच्या यशानंतर ज्याच्यातोंडी अमृताचं नाव आहे. अमृताच्या कामाचं खूप कौतुक होताना दिसतंय. यानंतर अमृता झलक दिखला जा या कार्यक्रमात  ( Jhalak Dikhla Ja Reality show) दिसणार आहे. सगळीकडून अमृताचं कौतुक होत असताना तिच्या आयुष्यात एक दु:खद घटना घडलीय. तिच्या जवळची व्यक्ती तिला सोडून गेलेली आहे. (  Amruta Khanvilkar special post for lost of special person in her life )

अधिक वाचा : कधी आहे पिठोरी अमावस्या? जाणून घ्या सविस्तर

इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून अमृताने ही बातमी तिच्या चाहत्यांना दिलेली आहे. अमृताच्या मावशीचं निधन झालं आहे. तिच्या आयुष्यात तिच्या मावशीचं खूप महत्त्वाचं स्थान होतं.अमृताने पोस्टमध्ये लिहिलेलं आहे की, “आता शांत झोप माझी माउली आता तुला कधीच कुठला त्रास होणार नाही. मनसोक्त आईसक्रीम खा .... छान रहा .... नीट रहा. 
आणि कसलीच काळजी करू नकोस आता आप्पा आजी तुझी काळजी घेतील. तू परत लहान होऊन जा ... तू आज पर्यंत जे जे केलस घरच्यांसाठी.... आमच्या कुटुंबासाठी त्याची परतफेड आम्ही कोणी करूच शकत नाही मम्मा ... मी ... अदिती आम्ही खूप लकी होतो कि तुझी सावली होती आमच्यावर नाहीतर आम्ही हरवलो असतो माऊ खूप मिस करणार ग तुला .... खूप.. अजून आपल्याला किती फिरायचं होतं बोलायचं होतं .... मॉम ला …मला तुला खूप काही सांगायचं होतं सगळंच राहून गेलं पण माऊ तू नीट राहा आता तू काळजी करू नकोस.”

अधिक वाचा :  धोकेबाज बॉयफ्रेंडचा तिने घेतला बदला

मावशीपेक्षा आई बनून मावशीने सांभाळ केल्याचं अमृताने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिच्यासाठी तिची मावशी खूप काही होती. मावशीच्या निधनाचे दु:ख अतीव असल्याचं अमृताचं म्हणणं आहे. 

अधिक वाचा :  ''या दोन गोष्टींमुळे श्रीमंत देशापेक्षा मागे पडला भारत देश''

अमृताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिचा चंद्रमुखी हा सिनेमा खूपच गाजला. त्यातील अमृताच्या अभिनयाचंही सगळीकडे कौतुक झालं.  तिने नुकतीच तिची डान्स जर्नी चाहत्यांसोबत शेअर केली. गणेशत्सवासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन व्हायचं त्यामध्ये तिने डान्स करायला सुरुवात केली असं तिने यादरम्यान सांगितलं आहे. आणि तिथूनच अमृताला नृत्याची आवड निर्माण झाली असंही ती म्हणाली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी