....अन् मल्टिफ्लेक्समधले मराठी चित्रपटांचे शो रद्द, सोशल मिडियावर हॅशटॅग झाला ट्रेंड

Marathi films : गेल्या आठवड्यामध्ये बहुचर्चित गोदावरी आणि सनी या दोन्ही चित्रपटांचे सर्व शो हाऊसफुल्ल होत आहेत. परंतु चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोन दिवसांतच मल्टिप्लेक्स चालकांनी त्यांचे शो कमी केल्यानं मराठी चित्रपट कलाकारांनी संताप व्यक्त केला.

थोडं पण कामाचं
  • मल्टिप्लेक्स चालकांनी मराठी चित्रपट शो कमी केले
  • प्रेक्षकांना बुकिंग केलेल्या तिकिटाचे पैसे परत
  • मराठी कलाकरांनी संताप व्यक्त केला.  

मुंबई : गेल्या आठवड्यामध्ये दोन बहुचर्चित जितेंद्र जोशीचा गोदावरी आणि हेमंत ढोमे याचा सनी  हे दोन चित्रपट प्रदर्शित झालेत. या चित्रपटांचे प्रीरिलिज शो हाऊसफुल्ल ठरले होते. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर हे दोन्ही चित्रपट चांगली कमाई करतील असा असा अंदाज होता. पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोन दिवसांतच मल्टिप्लेक्स चालकांनी त्यांचे शो कमी केले आणि मराठी रसिक प्रेक्षकांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा झाली (...and shows of Marathi films in multiplexes are cancelled,)

अधिक वाचा : 'तारक मेहता का उल्टा चश्मा'ची बबीता अपघातात जखमी

बहुचर्चित गोदावरी आणि सनी जिथं लागले आहेत, तिथं त्यांचे सर्व शो हाऊसफुल्ल होत आहेत. पण एक वेगळंच चित्र समोर आलं आहे. हिंदीत प्रदर्शित झालेल्या विविध चित्रपटांसाठी मराठी चित्रपटाचे शो रद्द केले जात आहेत. एवढेच नव्हे ज्या प्रेक्षकांनी शो आधीच बुक केला आहे, त्यांना शो रद्द केल्याचा मेसेज पाठवला जातो आहे आणि त्यांना बुकिंग केलेल्या तिकिटाचे पैसे परत केले जात आहेत. 

अधिक वाचा : धक्कादायक : 24 वर्षांच्या अभिनेत्रीचा Heart Attack ने मृत्यू

या घटनेनंतर दिग्दर्शक आणि अभिनेता हेमंत ढोमे याने सोशल मीडियावर काही पोस्ट करत हे चित्र सर्वांसमोर आणले. त्याने लिहिलेलं, 'पुन्हा एकदा महाराष्ट्रात मराठी चित्रपटांची गळचेपी. या राज्यात मराठी चित्रपटसाठी जर आता एक शो मिळवायला झगडावं लागत असेल तर कठीण आहे! त्यानंतर इतर मराठी कलाकरांनी संताप व्यक्त केला.  त्यापाठोपाठ मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी तर मल्टिप्लेक्स चालकांना सज्जड इशारा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात मराठी चित्रपट कलाकार आणि मल्टिफ्लेक्स चालक यांच्यामध्ये वाद रंगणार आहे. दरम्यान, सोशल मिडियावर मराठी प्रेक्षक भडकले असून #supportmarathifilms असा हॅशटॅगही व्हायरल होत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी