Autograph Movie Release Date: 'या' दिवशी रिलीज होणार 'ऑटोग्राफ' सिनेमा, जपून ठेवावी अशी एक Lovs Story

मराठी पिक्चर बारी
Updated Nov 29, 2022 | 15:09 IST | टाइम्स नाऊ मराठी

Autograph Movie Release Date: एक जपून ठेवावी अशी लव्हस्टोरी... 'ऑटोग्राफ' हा सिनेमा येत्या 30 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमृता खानविलकर (Amruta khanvilkar), उर्मिला कोठारे (Urmila kothare), मानसी मोघे (Manasi moghe), आणि अंकुश चौधरी (Ankush Chaudhri ) यांची लवकरच एक नवीकोरी मराठी लव्हस्टोरी येत आहेत. सतीश राजवाडे दिग्दर्शित 'ऑटोग्राफ' या सिनेमाचा टीझर ( Marathi New Film Autograph) प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

Autograph Movie Release Date 30 th December
'या' दिवशी थिएटरमध्ये झळकणार 'ऑटोग्राफ' 
थोडं पण कामाचं
  • नवा मराठी सिनेमा 'ऑटोग्राफ' 30 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार
  • मराठीतील आघाडीचा दिग्दर्शक सतीश राजवाडेंचं दिग्दर्शन
  • अंकुश चौधरी, अमृता खानविलकर, उर्मिला कानेटकर, मानसी मोघेंच्या प्रमुख भूमिका

Autograph Movie Release Date: अमृता खानविलकर (Amruta khanvilkar) आणि अंकुश चौधरी (Ankush Chaudhri ), उर्मिला कोठारे (Urmila kothare), मानसी मोघे (Manasi moghe), यांची लवकरच एक नवीकोरी मराठी लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सतीश राजवाडे या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. 
'ऑटोग्राफ' या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 30 डिसेंबर 2022 ला हा सिनेमा रिलीज होणार आहे. 'ती सध्या काय करते' या सिनेमानंतर पुन्हा एकदा अंकुश चौधरी आणि सतीश राजवाडेएकत्र काम करणार आहेत. (Autograph Movie Release Date 30 th December)

अधिक वाचा : Maharashtra Weather Alert: ऐन हुडहुडीत धो-धो बरसणार पाऊस

मनात एक तरी लपवून किंवा जपून ठेवलेली लव्ह स्टोरी असते .....! पाऊस पडतोय, आणि बँकराऊंडला ला अंकुश चौधरी म्हणतोय,'काहीही कारण नसताना, कोणतीही ओळख नसताना, काही माणसं भेटतात आणि त्यांची आठवण आपल्या मनावर कायमची कोरून जातात. ती माणसं, ते नाव, त्यांचा तो ठसा कायम जपून ठेवावासा वाटतो, एखाद्या ऑटोग्राफसारखा. होय, कारण आपण ऑटोग्राफ मागून घेतो, जपून ठेवण्यासाठी कायमचा'. अशी ही हळुवार, नाजूक अशी प्रेमकहाणी असणार हे टीझरवरून लक्षात येतय. 


मराठी इंडस्ट्रीमधील आघाडीचा अभिनेता अंकुश चौधरी या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तर मराठीतील सध्याची आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर, उर्मिला कोठारे, मानसी मोघे यांच्याही प्रमुख भूमिका या  सिनेमात आहेत. ती सध्या काय करते या सिनेमानंतर पुन्हा एकदा अंकुश आणि सतीश राजवाडे एकत्र काम करणार आहेत. 
तर चंद्रमुखी या सिनेमात कलावंतीणीची भूमिका साकारल्यानंतर आता अमृता खानविलकर एक वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अमृता ही मराठीतील टॉपची अभिनेत्री आहे. चंद्रमुखी या सिनेमात अमृताने साकारलेल्या चंद्राचं साऱ्यांनीच कौतुक केलं.

या सिनेमातील एक गाणंही नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. सिनेमातील हे रोमॅण्टिक गाणं  प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 

अधिक वाचा : अनुपम खेर यांनी इफ्फीच्या ज्युरी प्रमुखावर टीका

लव्ह स्टोरी हाताळण्यात हातखंडा असलेला मराठीतला आघाडीचा दिग्दर्शक सतीश राजवाडे पुन्हा एकदा एक नवी कोरी लव्ह स्टोरी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मुंबई-पुणे-मुंबई, प्रेमाची गोष्ट, ती सध्या काय करते या लव्ह स्टोरीजनंतर आता 'ऑटोग्राफ' या सिनेमातून पुन्हा एकदा लव्ह स्टोरी उलगडायला सज्ज झालेला आहे. 'जपून ठेवावी अशी लव्हस्टोरी' ही सिनेमाची कॅचलाईन आहे.


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी