‘आप्पा आणि ‘बाप्पा’मध्ये सुबोध-भरतची जुगलबंदी रंगणार, ‘या’ तारखेला रिलीज होणार सिनेमा

मराठी पिक्चर बारी
Updated Sep 12, 2019 | 18:10 IST | चित्राली चोगले

गेले अनेक दिवस एका आगामी सिनेमाच्या नावाने बरंच कुतुहल निर्माण केलय.आप्पा आणि बाप्पा या सिनेमाच्या नावाची चर्चा ऐन रंगात असतानाच सिनेमाचं पोस्टर रिलीज केलं गेलय. त्याचसोबत सिनेमाची रिलीज डेट सुद्धा जाहीर झालीय.

bharat jadhav and subodh bhave starrer Marathi film appa aani bappa poster is out
‘आप्पा आणि ‘बाप्पा’मध्ये सुबोध-भरतची जुगलबंदी रंगणार, सिनेमा ‘या’ तारखेला रिलीज होणार 

थोडं पण कामाचं

  • 'आप्पा आणि बाप्पा' या आगामी मराठी सिनेमाचं पोस्टर रिलीज
  • सिनेमात भरत जाधव आणि सुबोध भावेची जुगलबंदी रंगणार
  • सिनेमा येत्या ११ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई: गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष सध्या सर्वत्र ऐकायला मिळत आहे. सगळीकडे लाडक्या बाप्पाच्या आगमनाने छान प्रसन्न वातावरण आहे आणि आता तर लाडक्या बाप्पाला निरोप द्यायची वेळ सुद्धा आली आहे. याच सगळ्या लाडक्या बाप्पाच्या जयघोषात अजून एका बाप्पाचा विषय रंगला आहे. या बाप्पासोबत आप्पा सुद्धा आहे. कोण आहेत हे बाप्पा आणि आप्पा चला पाहुयात. गेले अनेक दिवस एका आगामी मराठी सिनेमाच्या नावाने खूप कुतुहल निर्माण केलं आहे. अखेर या सिनेमाचं पहिलं पोस्टर भेटीला आलं आहे आणि सिनेमाबद्दलच्या उत्सुकतेत भर पडली आहे.

सगळीकडे असलेल्या बाप्पामय वातावरणात सोशल मीडियावर आप्पा आणि बाप्पा सिनेमाचं पोस्टर रिलीज केलं गेलं. ‘आप्पा येतोय बाप्पा सोबत!’ या टॅगलाइनसह रिलीज झालेल्या या पोस्टरमध्ये अभिनेता सुबोध भावेने पाटावर बसलेल्या भरत जाधवला उचलून घेतले आहे असं दिसून येतं. तर एका पोस्टरमध्ये असंच भरतने पाटावर बाप्पाला उचलून घेतलं आहे. हा बाप्पा खरंतर सुबोध आहे असं दिसतं. त्यामुळे सिनेमातले आप्पा आणि बाप्पा कोण हे अगदी सहज लक्षात येतं. हे धमाल पोस्टर रिलीज होताच सगळीकडे सिनेमाची बरीच चर्चा रंगताना दिसत आहे. सिनेमात सुबोध आणि भरतची जुगलबंदी रंगणार आहे, त्यामुळे सिनेमा भलताच गाजतो आहे. या मजेशीर पोस्टरमुळे सिनेमाविषयी सगळ्यांचंच लक्ष आता या सिनेमाकडे लागलेलं आहे हे निश्चित.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे पोस्टर रिलीज केलं गेलं आहे. पोस्टरमध्येही गणेशोत्सवाच्या माहोलाची झलक अगदी स्पषट दिसत असल्यामुळे गणपतीबाप्पाची कमाल या सिनेमात असेल हे काय वेगळं सांगायला नको. पोस्टरवर सुबोध-भरतसोबत बाप्पासुदधा ठळकपणे दिसतो म्हणजेच बाप्पा या सिनेमाचा महत्त्वाचा घटक असेलंच. ‘सन ऑफ सरदार’ व ‘अतिथी तुम कब जाओंगे’ असे हिट बॉलिवूड सिनेमे प्रस्तुत केलेल्या गरिमा प्रोडक्शन्स ‘आप्पा आणि बाप्पा’ हा सिनेमा प्रस्तुत करत आहे. हा या बॅनरचा पहिलाच मराठी सिनेमा असणार आहे.

गरिमा धीर व जलज धीर या सिनेमाचे निर्माते आहेत. अश्वनी धीर व अरविंद जगताप यांनी सिनेमाचं लेखन केले आहे. छायाचित्रण सूर्या मिश्रा यांचं आहे. संगीताची जबाबदारी सारंग कुलकर्णी, सायली खरे, अभंग रीपोस्ट यांनी सांभाळली आहे. लाईन प्रोड्यूसर अजितसिंग आहेत. ‘पॅनोरमा स्टुडिओज् डिस्ट्रीब्युशन एलएलपी’ तर्फे हा सिनेमा रिलीज केला जाणार आहे. भरत जाधव, सुबोध भावे यांच्यासह या सिनेमात दिलीप प्रभावळकर, संपदा कुलकर्णी, शिवानी रांगोळे हे कसलेले कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसतील. भरत आणि सुबोधची धमाल केमिस्ट्री सिनेमात पहायला मिळणार असून सिनेमाचा सगळ्यात मोठा यूएसपी ठरेल. ‘आप्पा आणि बाप्पा’ ही धमाल राईड अनुभवण्यासाठी प्रेक्षकांना मात्र येत्या ११ ऑक्टोबरची वाट पहावी लागणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...