पुन्हा एकदा मराठी सिनेमात झळकण्यासाठी बिग बी अमिताभ सज्ज

मराठी पिक्चर बारी
Updated May 09, 2019 | 19:53 IST | टाइम्स नाऊ मराठी

Marathi Movie time again for Big B: बिग बी अमिताभ बच्चन यांनी नेहमीच मराठी सिनेमाची प्रशंसा केली आहे. काही वर्षांपूर्वी एका मराठी सिनेमात झळकल्यानंतर आता ते सज्ज झाले आहेत त्यांच्या दुसऱ्या मराठी सिनेमासाठी.

Big B Amitabh Bachchan to portray a pivotal role in Marathi movie AB ani CD
पुन्हा एकदा मराठी सिनेमात झळण्यासाठी बिग बी अमिताभ सज्ज  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांचं नाव एखाद्या कलाकृतीला जोडलं जाणं म्हणजे आपसूकचं ती कलाकृती उत्तम असल्याची ग्वाही असते. त्यांचे सिनेमे असो किंवा छोट्यात छोटी जाहिरात ती लोकप्रियता मिळवतेच. या महानायकाने कायमच मराठी इंडस्ट्रीची प्रशंसा केली आहे. मराठी सिनेमाच्या त्यांना अनेक ऑफर आल्या मात्र त्यातल्या सगळ्याच करणं शक्य नव्हतं त्यात ही अनेक वर्षांआधी १९९४ साली बिग बी 'अक्का' या मराठी सिनेमात सपत्नीक एका गाण्यात झळकले आणि सिनेमाची वेगळीच प्रसिद्धी झाली, हा सिनेमा बिग यांचे पर्सनल दीपक सावंत यांनी दिग्दर्शित केला होता. आता ते पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत त्यांच्या दुसऱ्या मराठी सिनेमासाठी. एबी आणि सिडी नावाच्या मराठी सिनेमात बिग बी झळकणार असल्याचं समजतंय.

मिलिंद लेले दिग्दर्शित या सिनेमात अमिताभ यांची महत्त्वाची भूमिका असेल. या सिनेमात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले मुख्य भूमिका साकारत आहेत, त्यांच्या मित्राच्या भूमिकेत बिग बी झळकतील असं बोललं जात आहे. येत्या 20 मे रोजी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार असून मुंबईत एका मोठ्या हॉलचं आयोजन या शूटसाठी केलं गेलं आहे. या हॉल मध्ये जवळपास 5 दिवसांचं शूट पार पडणार आहे आणि या शेड्यूलसाठी बिग बी हजर असतील अशी सध्या चर्चा आहे.

 

 

विक्रम गोखले आणि अमिताभ बच्चन या जोडीची जुगलबंदी 1990 साली अग्निपथ सिनेमात उत्तम रंगली होती. ‘विजय दीनानाथ चव्हाण’ या नावापासून बिग बींचा पुढचा प्रसिद्ध डायलॉग कमिश्नर गायतोंडे म्हणजेच विक्रम गोखले यांच्या समोर रंगतो. हीच जुगलबंदी पुन्हा एकदा प्रेक्षकांना एबी आणि सिडी या मराठी सिनेमातून अनुभवायला मिळणार असं दिसंतय.

 

एबी आणि सिडी या नावात सिनेमाची कथा लपलेली आहे. एबी असं अमिताभ बच्चन यांना अनेकदा प्रेमाने संबोधलं जातं तेच या सिनेमात वापरलं गेलं आहे तर सिडी हे विक्रम गोखले यांच्या चंद्रकांत देशपांडे या कॅरेक्टरच्या नावाची पहिली दोन इंग्रजी अक्षरं आहेत. चंद्रकांत देशपांडे हे एक निवृत्त चित्रकला शिक्षक आयुष्य जगत असताना त्यांच्या उतार वयात त्यांना अचानक लक्षात येतं की एबी म्हणजेच अमिताभ बच्चन आपला वर्ग मित्र आहे आणि पुढे त्यांचं अख्खं आयुष्यंच बदलून जातं. त्यामुळे कथेत बिग बी हे खुद्द अमिताभ बच्चन म्हणूनंच दिसतील. या कथेचे लेखक हेमंत एदलाबादकर यांनी या सिनेमावर बोलताना सांगीतलं की ते स्वतः दिग्दर्शक मिलिंद आणि अभिनेते विक्रम गोखलेंसोबत बिग बी यांना प्रत्यक्षात भेटले आणि कथा ऐकवली. त्यांना कथा आवडल्यावरच त्यावर नीट विचार करुन बिग बींनी आपला होकार त्यांना कळवला होता. हा सिनेमा एक हलका फुलका कौटुंबिक सिनेमा असून सध्या सिनेमाच्या इतर कलाकारांचं कास्टिंग अद्यापतरी फायनल झालं नाहीये. बिग बी यात दिसणार म्हणजे सिनेमाची एक वेगळीच उत्सुकता निर्माण होणार आणि तो सिनेमाचा यूएसपी ठरणार हे काय वेगळं सांगायला नको.

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
पुन्हा एकदा मराठी सिनेमात झळकण्यासाठी बिग बी अमिताभ सज्ज Description: Marathi Movie time again for Big B: बिग बी अमिताभ बच्चन यांनी नेहमीच मराठी सिनेमाची प्रशंसा केली आहे. काही वर्षांपूर्वी एका मराठी सिनेमात झळकल्यानंतर आता ते सज्ज झाले आहेत त्यांच्या दुसऱ्या मराठी सिनेमासाठी.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
Shilpa Shetty: अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नाकारली १० कोटींच्या जाहिरातीची ऑफर, जाणून घ्या कारण
Shilpa Shetty: अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नाकारली १० कोटींच्या जाहिरातीची ऑफर, जाणून घ्या कारण
Box office: मिशन मंगल आणि बाटला हाऊस सिनेमाचं दोन दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन
Box office: मिशन मंगल आणि बाटला हाऊस सिनेमाचं दोन दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन
[VIDEO] अनुष्का शेट्टीसोबतच्या रिलेशनशिपवर साउथ सुपरस्टार प्रभासनं मौन सोडलं
[VIDEO] अनुष्का शेट्टीसोबतच्या रिलेशनशिपवर साउथ सुपरस्टार प्रभासनं मौन सोडलं
[VIDEO] शाहरूख खान लवकरच या सिनेमातून करणार कमबॅक
[VIDEO] शाहरूख खान लवकरच या सिनेमातून करणार कमबॅक
[VIDEO] : आलियाला लग्नाची मागणी घालताच रणबीर कपूर झाला भावूक
[VIDEO] : आलियाला लग्नाची मागणी घालताच रणबीर कपूर झाला भावूक
[VIDEO]: जाणून घ्या अभिनेता मिलिंद सोमण यांच्या फिटनेसचं सीक्रेट
[VIDEO]: जाणून घ्या अभिनेता मिलिंद सोमण यांच्या फिटनेसचं सीक्रेट
Salman Khan Wedding: या २१ वर्षींय अभिनेत्रीला सलमानसोबत करायचंय लग्न, व्यक्त केली इच्छा
Salman Khan Wedding: या २१ वर्षींय अभिनेत्रीला सलमानसोबत करायचंय लग्न, व्यक्त केली इच्छा
Batla House: जॉन अब्राहमच्या 'बाटला हाऊस'ची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई, पाहा तिसऱ्या दिवशी किती कमावला गल्ला
Batla House: जॉन अब्राहमच्या 'बाटला हाऊस'ची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई, पाहा तिसऱ्या दिवशी किती कमावला गल्ला