Girls Bold Poster: 'बॉइज' आणि 'बॉइज 2'च्या यशानंतर आता ‘गर्ल्स’ करणार धमाल, सिनेमाचं बोल्ड पोस्टर भेटीला

मराठी पिक्चर बारी
Updated Oct 09, 2019 | 16:37 IST | चित्राली चोगले

'बॉइज' आणि 'बॉइज 2' या दोन्ही सिनेमांच्या यशानंतर दिग्दर्शक विशाल सखाराम देवरुखकर आता सज्ज झालेत ते मुलींच्या दुनियेत न्यायला गर्ल्स सिनेमातून. गर्ल्स या आगामी सिनेमाचं बोल्ड पोस्टर नुकतंच रिलीज केलं गेलं आहे.

bold poster of upcoming marathi movie girls gets released have a look
Girls Bold Poster: 'बॉइज' आणि 'बॉइज 2'च्या यशानंतर आता ‘गर्ल्स’ करणार धमाल, सिनेमाचं बोल्ड पोस्टर भेटीला 

थोडं पण कामाचं

  • 'बॉइज' आणि 'बॉइज 2'च्या यशानंतर आता ‘गर्ल्स’ करणार धमाल
  • ‘गर्ल्स’ सिनेमाचं बोलड पोस्टर भेटीला
  • मुलींच्या भावविश्वाची सफर घडवणारा ‘गर्ल्स’ येत्या २९ नोव्हेंबर रोजी होणार रिलीज

मुंबई: 'बॉइज' आणि 'बॉइज 2' हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर धमाल करुन गेले. या सिनेमांचा आशय- विषय खूप वेगळा होता तसाच तो थोडा बोल्ड देखील होताच. तरुणाईला हे दोन्ही सिनेमे विशेष आवडले. या दोन्ही सिनेमांच्या भरघोस यशानंतर विशाल सखाराम देवरुखकर आता घेऊन येत आहेत, मुलींच्या अजब आणि हटके विश्वाची धमाकेदार सफर 'गर्ल्स' सिनेमाच्या रूपात. या सिनेमाचं बोल्ड पोस्टर नुकतंच भेटीला आलं आहे आणि ते पाहताच अनेकांच्या भुवया नक्कीच उंचावल्या शिवाय राहणार नाहीत. बॉईज, टकाटक अशा सिनेमांनंतर गर्ल्सचे हे पोस्टर पाहुन मराठी सिनेमा कात टाकतो आहे असं नक्कीच वाटायला लागलं आहे.

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि कायरा कुमार क्रिएशनस प्रस्तुत गर्ल्स हा सिनेमा तरुणींच्या एका अनोख्या जगाची सफर घडवणार आहे. मराठी सिनेमांमध्ये मुलांवर आधारित, त्यांच्या शाळा, कॉलेज जीवनावर आधारित अनेक सिनेमे येऊन गेले आहेत किंबहुना येतच असतात. मात्र, मुलींवर आधारित, त्यांच्या मजा मस्तीवर आधारित सिनेमा अद्यापतरी रिलीज झालेला नाही. हीच मजा, मस्ती पडद्यावर दाखवण्यासाठी एक धमाल मनोरंजक सिनेमा गर्ल्स आता लवकरच भेटीला येणार आहे. या सिनेमाचं बोल्ड पोस्टरला पाहुन तरुणाईमध्ये सिनेमाबद्दल उत्सुकता नक्कीच निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. पाहा सिनेमाचं हे बोल्ड पोस्टर.

बॉईजचं भावविश्व हाताळल्यावर आता गर्ल्सच्या भावविश्वात हा सिनेमा घेऊन जाणार आहे. एकविसाव्या शतकात चौकटीबाहेर जाऊन आयुष्य जगणाऱ्या आजच्या काळातील मुलींचे जग त्यांची मज्जा-मस्ती याचं चित्रण गर्ल्समधून दिसणार आहे. अ कायरा कुमार क्रिएशन प्रॉडक्शनच्या अंतर्गत गर्ल्स या चित्रपटाची निर्मिती नरेन कुमार, सुजाता एन. कुमार यांची असून, अमित भानुशाली यांनी असोसिएट प्रोड्युसर म्हणून काम पाहिले आहे.

असं म्हणतात, की मुलींच्या मनाचा ठाव घेणं जरा कठीणच असतं आणि याचा अनुभव दिग्दर्शक विशाल देवरुखकर आणि लेखक हृषिकेश कोळी यांना सुद्धा गर्ल्स साकारताना आला. सिनेसृष्टीला बॉईज आणि बॉईज २ सारखे जबरदस्त हिट्स दिल्यानंतर विशाल देवरुखकर आणि हृषिकेश कोळी या जोडीला गर्ल्स केंद्रित एखादा चित्रपट करायचा होता. तसंही मुलींच्या दुनियेची सफर घडवणारा विषय मराठी सिनेसृष्टीत हाताळला गेला नाहीये, त्यामुळे हा सिनेमा नेमकं काय दर्शवणार याकडे लक्ष लागलं आहे. हा सिनेमा आधी १५ नोव्हेंबर २०१९ रोजी रिलीज होणार होता पण आगामी फत्तेशिकस्तसोबत बॉक्स ऑफिस टक्कर टाळण्याठी सिनेमाच्या निर्मात्यांनी सूज्ञ निर्णय घेतला आणि सिनेमा पुढे ढकलला. आता गर्ल्स हा सिनेमा येत्या २९ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी