फुल्ल टू धमाल करायला "स्वीटी सातारकर" सज्ज, पहा धमाकेदार ट्रेलरची झलक

मराठी पिक्चर बारी
Updated Feb 21, 2020 | 14:50 IST | चित्राली चोगले

Sweety Satarkar Trailer: धमाकेदार मराठी सिनेमा स्वीटी सातारकर याचा धमाल ट्रेलर नुकताच भेटीला आलाय. सिनेमात अमृता देशमुख आणि संग्राम समेळ ही नवीन जोडी पहायला मिळणारे. सिनेम येत्या २८ फेब्ररुवारीला भेटीला येईल.

check out upcoming marathi film sweety satarkar’s energetic and fun trailer
फुल्ल टू धमाल करायला "स्वीटी सातारकर" सज्ज, पहा धमाकेदार ट्रेलरची झलक 

थोडं पण कामाचं

  • "स्वीटी सातारकर"चा धमाकेदार ट्रेलर सोशल मीडियावर लाँच
  • संग्राम समेळ-अमृता देशमुखची नवीन जोडी झळकणार
  • २८ फेब्रुवारीला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई: "स्वीटी सातारकर" हे नाव गेले अनेक दिवस ऐकयला मिळत आहे. मध्यंतरी या सिनेमाची घोषणा झाली आणि सिनेमाच्या नावाने लक्ष वेधून घेतलं. तसंच सिनेमाचा टीझर भेटीला आला आणि सिनेमाची झलक पाहून सिनेमाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. "तू जेव्हा थैलीत होता ना तेव्हा मी पहिलीत होते", "साडी बघायच्या वयात हा गाडी का बघतोय....." असे खटकेबाज संवाद असलेली आगळीवेगळी प्रेमकहाणी या सिनेमात रंगणार आहे. या सिनेमाची चर्चा रंगलेली असतानाच सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. स्वीटी सातारकर या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला असून अवघ्या काही वेळातच सोशल मीडियावर उत्तम प्रतिसाद या ट्रेलरला मिळताना दिसला.

गावात राहणारी धमाल आणि एकदम बिनधास्त अशी स्वीटी म्हणजेज अभिनेत्री अमृता देशमुख तर स्मार्ट असा शेखर म्हणजे अभिनेता संग्राम समेळ. या दोन विरुद्ध हिरो-हिरोईनची जोडी कशी जमणार आणि त्यामध्ये येणारे धमाकेदार ट्विस्टने सिनेमाची रंजक सफर सजली आहे. स्वीटीचा धमाल अंदाज आणि तीची शैली नक्कीच भाव खाऊन जाते. तर दुसरीकडे शेखर दा म्हणजेज भाऊ मानलेल्या हिरोला ती कशी पटवणार याची उत्सुकता निश्चित वाढते. सिनेमाचा ट्रेलर सिनेमाची उत्सुकता वाढवणारा ठरतो.

पहा धमाकेदार ट्रेलर

 

 

हलकीफुलकी कथा, उत्तम कलाकार, तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असलेल्या या सिनेमाला निश्चितपणे प्रेक्षकांची दाद मिळवणार हा अंदाज ट्रेलर पाहुन वर्तवला जाऊ शकतो. खटकेबाज संवाद हे तर सिनेमाचं विशेष वैशिष्ट्यच ठरणार आहे असं दिसत आहे. त्यामुळे ज्या तरुणावर स्वीटी सातारकर जीव ओवाळून टाकते, तिला तो मिळणार का, याचं उत्तर सिनेमा पाहिल्यावरच मिळेल. त्यासाठी मात्र प्रेक्षकांना २८ फेब्रुवारीची वाट पहावी लागणार आहे.

 

 

 

सिनेमामध्ये अमृता देशमुख, संग्राम समेळ, विजय निकम, गौरी जाधव, वंदना वाकनीस, पुष्कर लोणारकर, विनम्र भाबल, प्रशांत विचारे अशी दमदार स्टारकास्ट आहे. तर सिनेमाची निर्मिती मुनाफ नाईक, संतोष साबळे यांनी केली आहे. सिनेमाचं दिग्दर्शन शब्बीर नाईक यांनी केलं असून ध्रुव दास, सतीश जांबे, रिया तेंडुलकर, सुधाकर ओमळे आणि स्वरूप स्टुडिओझ हे या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते आहेत. सुमित गिरी यांनी सिनेमाचं लेखन, संतोष मुळेकर यांनी संगीत दिग्दर्शन, फैसल महाडिक यांनी संकलन, मंगेश कांगणे आणि सुहास सावंत यांनी गीतलेखन केलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी