'कोर्ट' फेम अभिनेता वीरा साथीदार यांचे कोरोना संसर्गामुळे निधन

अभिनेता वीरा साथीदार यांचा कोरोना संसर्गामुळे निधन झाले आहे. वीरा साथीदार यांनी मराठीतील कोर्ट(Court Movie) या चित्रपटात दमदार भुमिका केली होती.

'Court' fame actor Veera Sathidar dies of corona virus infection
'कोर्ट' फेम अभिनेता वीरा साथीदार यांचे कोरोनामुळे निधन  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • वीरा साथीदार यांनी कोर्ट चित्रपटात दमदार भुमिका साकारली होती
  • ‘विद्रोही’ या मराठी मासिकाचे संपादक होते वीरा साथीदार
  • कोर्ट चित्रपटाला मिळाला आहे राष्ट्रीय पुरस्कर

मुंबई: अभिनेता वीरा साथीदार यांचा कोरोना संसर्गामुळे निधन झाले आहे. वीरा साथीदार यांनी मराठीतील कोर्ट(Court Movie) या चित्रपटात दमदार भुमिका केली होती. वीरा साथीदार यांच्या निधनामुळे एक बहुआयामी अभिनेता, विचारवंत आणि आंबेडकरी चळवळीतील आधारस्तंभ कोसळल्याची भावना व्यक्त होत आहे.(Actor Veera Sathidar Passes Away)

कोरोनाचे संकट राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाने अनेक आपल्या माणासांना आपल्यापासून हिरावून घेतलं आहे. चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे. अभिनेते  वीरा साथीदार याचा 'कोर्ट' या चित्रपटातील भुमिका अनेक प्रेक्षकांच्या मनात बसली होती. 'कोर्ट' चित्रपटात वीरा साथीदार यांनी साकारलेल्या भूमिकेचे सर्व स्तरातून कौतुक झाले. या चित्रपटाला अनेक पुरस्कारही मिळाले. राष्ट्रीय पुरस्कारानेही या चित्रपटाला गौरविण्यात आले होते.

काही दिवसांपूर्वीच वीरा साथीदार यांची कोरोना व्हायरस (Coronavirus) चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यानंतर त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान प्रकृती खालावल्याने मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचे निधन झाले. अभिनेता विरा साथीदार हे कोर्ट चित्रपटामुळे अनेकांपर्यंत पोहोचले होते. मात्र, केवळ अभिनेते अशीच त्यांची ओळख नव्हती. त्याही आधी ते नागपूर येथील प्रसिद्ध विचारवंत, लेख आणि आंबेडकरी चळवळीतील प्रमुख लढवय्ये म्हणून सर्वांना परिचीत होते. आंबेडकरी चळवळीत त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

वीरा साथिदार यांचा जन्म १९६० मध्ये नागपूर येथे झाला. त्यांचे बालपण आणि सुरुवातीचे आयुष्य संघर्षमय गेले. सुरुवातीच्या काळात ते मेंढपाळ म्हणून काम करत होते. दरम्यानच्या काळात त्यांना लोकसंगीत आणि लोकसाहित्याची गोडी लागली. चित्रकला आणि शिल्पकलेसह साहित्यातही वीरा साथिदार यांनी जोरदार मुशाफीरी केली आहे. ते एक कवी आणि गायक म्हणूनही लोकांना परिचीत होते. ते ‘विद्रोही’ या मराठी मासिकाचे संपादक आणि लोकशाही हक्क कार्यकर्ते होते.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी