७ वर्षांच्या ब्रेकनंतर रिअल लाईफ कपल प्रिया बापट-उमेश कामत दिसणार रिल लाईफमध्ये एकत्र

मराठी पिक्चर बारी
Updated Jul 12, 2019 | 13:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

Priya Bapat-Umesh Kamat Web Series: प्रिया बापट-उमेश कामत ही रिअल लाईफ जोडी ७ वर्षांपूर्वी पडद्यावर एकत्र दिसली. तेव्हापासून फॅन्स ते पुन्हा एकत्र पडद्यावर कधी दिसणार ही वाट पाहत होते. अखेर ही प्रतीक्षा संपली.

Cute couple Priya Bapat-Umesh Kamat to go from real to reel after 7 years for Marathi web series Aani Kay hava
७ वर्षांच्या ब्रेकनंतर रिअल लाईफ कपल प्रिया बापट-उमेश कामत दिसणार रिल लाईफमध्ये एकत्र 

थोडं पण कामाचं

  • प्रिया बापट-उमेश कामत पुन्हा एकदा रिअल टू रिल दिसणार
  • 'आणि काय हवं' या मराठी वेबसीरिजसाठी ७ वर्षांनंतर एकत्र येणार
  • 'इतकी वर्षं थांबल्याचा निश्चितच फायदा झाला'-उमेश कामत

मुंबई: मराठी सिनेसृष्टीत अशा अनेक जोड्या आहेत ज्या ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन तितकीच कमाल केमिस्ट्री कॅरी करतात. अशीच एक तरूण आणि गोड जोडी आहे प्रिया बापट आणि उमेश कामत यांची. हे रिल लाईफ कपल आता रिअल लाईफमध्ये पुन्हा एकदा एकत्र येण्यासाठी सज्ज झालं आहे. २०११ साली विवाहबंधनात अडकलेली ही जोडी २०१३ साली रिलीज झालेल्या टाईम प्लीज या सिनेमात एकमेकांसमोर दिसली. त्यानंतर मात्र या दोघांचा एकत्र येण्याचा योग काही जुळून आला नाही. आणि यांच्या फॅन्सने ती गोष्ट खूप मिस केली. पण आता या फॅन्ससाठी एक खूशखबर आहे कारण सांगितल्याप्रमाणे ही जोडी तब्बल ७ वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा एकत्र येत आहे. 'आणि काय हवं' या वेबसीरिजमधून हे क्यूट कपल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

७ वर्षांनी एकत्र दिसणार याबद्दल फॅन्स जितके खुश आहेत तितकाच आनंद या जोडीला ही झालाच आहे आणि प्रिया आणि उमेश त्यांच्या या नवीन प्रवासासाठी सज्ज झाले आहेत. 'आणि काय हवं' या वेबसीरिजमध्ये प्रिया 'जुई'ची तर उमेश 'साकेत'ची ही कॅरेक्टर्स साकारताना दिसतील. वैवाहिक जीवनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला सामोरे जात असतानाच त्या सगळ्या आव्हानांना सामोरं जात जुई-साकेत प्रत्येक दिवशी एकमेकांच्या नव्यानं प्रेमात पडतात आणि त्यावरच ही वेबसीरिज आधारित आहे.

 

 

या वेबसीरिजबद्दल उमेश म्हणतो, ''सात वर्षांपूर्वी आम्ही एकत्र काम केलं होतं. एक मालिका, एक व्यावसायिक नाटक आणि त्यानंतर 'टाईम प्लीज' हा चित्रपट. अशा विविध माध्यमांमधून प्रिया आणि मी प्रेक्षकांच्या भेटीला आलो. मात्र त्यानंतर बराच काळ आम्ही एकत्र काम केलं नाही. परंतु कालांतरानं आम्हालाही याची जाणीव झाली, की आपण एकत्र काम केलं पाहिजे. काही प्रोजेक्ट्सबाबत आम्हाला विचारणाही करण्यात आली. मात्र इतक्या वर्षांच्या कालावधीनंतर एकत्र पडद्यावर झळकण्यासाठी आम्हाला ते विषय तितकेसे भावले नाहीत. याच दरम्यान अनिश जोग आणि वरूण नार्वेकर यांनी या वेबसीरिजबद्दल आम्हाला विचारणा केली. त्यांची संकल्पना ऐकल्यानंतर, त्या क्षणी मनात आले, की इतकी वर्षं थांबल्याचा निश्चितच फायदा झाला.''

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No caption needed ❤️

A post shared by Priya Bapat (@priyabapat) on

 

प्रत्येकाच्या आयुष्यात पहिल्या होणाऱ्या गोष्टी खूप खास ठरतात तसंच लग्नानंतर घेतलेलं पाहिलं घर, पहिली गाडी, एकत्र साजरा केलेला पहिला सण अशा लग्नानंतर एकत्र केलेल्या अनेक 'पहिल्या' गोष्टींची मज्जा काही औरंच असते नाही? याच सगळ्या लग्नानंतरच्या गोड आणि छोट्या छोट्या क्षणांवर ही वेबसीरिजमध्ये बेतलेली आहे. ही वेबसीरिज बघताना नकळत तुम्हीही तुमच्या आयुष्यातील या अमूल्य आठवणींना उजाळा द्याल. 'मुरांबा' फेम वरूण नावेकर दिग्दर्शित, अनिश जोग, रणजित गुगळे निर्मित 'आणि काय हवं' ही सहा भागांची वेबसिरीज १६ जुलैपासून एमएक्स प्लेयरवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
७ वर्षांच्या ब्रेकनंतर रिअल लाईफ कपल प्रिया बापट-उमेश कामत दिसणार रिल लाईफमध्ये एकत्र Description: Priya Bapat-Umesh Kamat Web Series: प्रिया बापट-उमेश कामत ही रिअल लाईफ जोडी ७ वर्षांपूर्वी पडद्यावर एकत्र दिसली. तेव्हापासून फॅन्स ते पुन्हा एकत्र पडद्यावर कधी दिसणार ही वाट पाहत होते. अखेर ही प्रतीक्षा संपली.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola