'खास रे'चं 'लस घ्या लस घ्या' गाणं लवकरच लाँच होणार

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील रस्त्यांवर काही तरुण फेमस वेबसिरीज 'मनी हाईस्ट'च्या गेटअपमध्ये नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करताना दिसतायेत..

For awareness about vaccination Team Khaas Re launching new song
'खास रे'चं 'लस घ्या लस घ्या' गाणं लवकरच लाँच होणार 
थोडं पण कामाचं
  • 'खास रे'चं 'लस घ्या लस घ्या' गाणं लवकरच लाँच होणार
  • गाण्याची उत्कंठा आता शिगेला पोहोचली
  • मनोरंजनात्मक पध्दतीने जनजागृती

पुणे: गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील रस्त्यांवर काही तरुण फेमस वेबसिरीज 'मनी हाईस्ट'च्या गेटअपमध्ये नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करताना दिसतायेत..हे पथनाट्य आहे का? हे तरुण कोण आहेत? ही कुठली सामाजिक संस्था आहे का? असा प्रश्न सगळ्यांना पडला होता..ह्यांचे व्हिडिओजही गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेत..हे युवक कोण आहे यावरून आता पडदा उठला असून ही आहे टीम 'खास रे'!  For awareness about vaccination Team Khaas Re launching new song

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे असलेला लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर गजबजलेल्या पुण्यातील रस्त्यांवर अचानक काही युवकांनी येऊन फिल्मी स्टाईलने लस घेण्याचं आवाहन करण्यास सुरुवात केली.. त्यामुळे आधी हे नेमकं काय चाललंय अशा आर्विभावात असलेल्या पुणेकरांनी नंतर मात्र हा माहौल एन्जॉय केला... नागरिक अजून ही गाफील आहेत.. नियमांचे काटेकोर पालन करत नाहीयेत.. तसेच लसीबद्दल ही वेगवेगळे संभ्रम पसरविले जातायेत.. त्यामुळे नागरिकांचे मनोरंजनात्मक पध्दतीने जनजागृती करण्यासाठी हे गाणं केल्याचं  टीम 'खास रे' आणि निर्माते नरेंद्र फिरोदिया यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलंय..

डिजीटल प्लॅटफॉर्मवर आपलं वेगळेपण जपणाऱ्या खास रे टीम ने यावेळी वेगळी थीम वापरून लस घेण्याचं आवाहन केलं आहे.. गाण्याची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन  संजय श्रीधरचं असून संदेश कालेकरनं संगीत बद्ध केलेलं हे गाणं निरंजन पेडगावकरनं गायलं आहे.. 'लस घ्या लस घ्या' हे गाणं लवकरच 'खास रे' च्या डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून गाण्याची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे..

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी