माजी क्रिकेटपटू अजित वाडेकरांची नवीन इनिंग, क्रिकेटप्रेम जपत ‘बाळा’ सिनेमात साकारणार एक विशेष भूमिका 

मराठी पिक्चर बारी
Updated Apr 22, 2019 | 16:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

‘बाळा’ हा क्रिकेटवर आधारित सिनेमात क्रिकट विश्वातील एक जगप्रसिद्ध नाव दिसणार अशी चर्चा रंगली होती. अखेर या नावाचा खुलासा झाला असून, क्रिकेटवर आधारित या सिनेमात ज्येष्ठ क्रिकेटपटू अजित वाडेकर झळकरणार असं समजतय.

Ace cricketer ex Indian Captain Ajit Wadekar to star in Marathi film Bala
‘बाळा’ सिनेमात ज्येष्ठ माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर झळकणार 

मुंबई: ‘बाळा’ हा क्रिकेटवर आधारित सिनेमा काही दिवसांपूर्वी जाहिर झाला. क्रिकेटवर आधारित या सिनेमात खेळातलं एक जगप्रसिद्ध नाव झळकणार आहे असं नुकतंच घोषित केलं गेलं आहे. हे नाव आहे यशस्वी माजी कर्णधार, दर्जेदार प्रशिक्षक आणि उत्तम संघटक अशी ख्याती असलेल्या ज्येष्ठ माजी क्रिकेटपटू अजित वाडेकरांचं. क्रिकेट संदर्भात सगळ्या पदावरुन निवृत्त होऊन अनेक वर्ष लोटली तरी या खेळाविषयी असलेलं त्यांचं प्रेम आजही कायम आहे आणि या खेळाशी जोडलं गेलेलं त्यांचं नातं अतूट आहे. याच क्रिकेटविषयी असलेल्या प्रेमाला जपत, जोपासत एक विशेष भूमिका ‘बाळा’ या आगामी मराठी सिनेमात त्यांनी साकारली आहे. ही बातमी क्रिकेटविश्वा इतकीच मराठी रसिकांसाठी ही आनंदाची ठरली. अजित वाडेकर हे मराठी अस्मितेसाठी खूप मोठं नाव आहे. देशाचं नाव त्याचसोबत मराठी माणसाचं नाव या मराठमोळ्या क्रिकेटपटूनं जगभरात गाजवलं आहे. त्यामुळे त्यांची ही नवीन इनिंग पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.

क्रिकेटवर आधारलेल्या ‘बाळा’ चित्रपटात क्रिकेट प्रशिक्षकाच्या भूमिकेत ते आपल्याला दिसणार आहेत. युवा खेळाडूंच्या गुणवत्तेची अचूक पारख त्यांना होती. कोणामध्ये किती क्षमता आहे ? हे त्यांना बरोबर माहित असे. ‘बाळा’ चित्रपटातल्या बाळा या मुलाच्या क्रिकेट ध्यासाची ते कशी दखल घेतात आणि त्याच्या गुणांची पारख करत त्याला कशाप्रकारे घडवतात याची प्रेरणादायी कथा या चित्रपटात पहायला मिळणार आहे. त्यामुळे अजित वाडेकर यांची भूमिका सिनेमात किती महत्त्वाची आहे हे तर अगदी सहज आहे.

Ace cricketer ex Indian Captain Ajit Wadekar to star in Marathi film Bala

या भूमिकेची ऑफर अजित वाडेकरांना केली असता, ‘मला अभिनय जमणार नाही!’, असं सांगणाऱ्या अजित वाडेकर यांना अभिनेता विक्रम गोखले यांनी ‘तुला अभिनय नाही तर तुझ्या आवडीची प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळायची आहे’, असं सांगितल्यानंतर विक्रम गोखले यांच्या विनंतीला मान देत अजित वाडेकर यांनी या चित्रपटाला होकार दिला असं समजतय.

‘यश अँड राज एंटरटेंनमेंट’ या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती, निर्माते राकेश सिंग यांनी केली असून सचिंद्र शर्मा यांनी या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात उपेंद्र लिमये, क्रांती रेडकर, विक्रम गोखले, सुहासिनी मुळ्ये, कमलेश सावंत या मातब्बर कलाकारांसोबत मिहीरीश जोशी हा नवा चेहरा तसेच यशवर्धन–राजवर्धन, आशिष गोखले,ज्योती तायडे अपेक्षा देशमुख, हिया सिंग हे सहकलाकार दिसणार आहेत. सोनू निगम, आदर्श शिंदे, रोहित राऊत, निहार शेंबेकर, उर्मिला धनगर या गायकांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. क्रिकेटवर आधारित ‘बाळा’ हा सिनेमा येत्या 3 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
माजी क्रिकेटपटू अजित वाडेकरांची नवीन इनिंग, क्रिकेटप्रेम जपत ‘बाळा’ सिनेमात साकारणार एक विशेष भूमिका  Description: ‘बाळा’ हा क्रिकेटवर आधारित सिनेमात क्रिकट विश्वातील एक जगप्रसिद्ध नाव दिसणार अशी चर्चा रंगली होती. अखेर या नावाचा खुलासा झाला असून, क्रिकेटवर आधारित या सिनेमात ज्येष्ठ क्रिकेटपटू अजित वाडेकर झळकरणार असं समजतय.
Loading...
Loading...
Loading...