Genelia D'Souza : जेनेलिया देशमुखने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत तिच्या कॉलेजच्या आठवणी शेअर केल्या आहेत. आपल्या भाचीच्या कोंसर्टमध्ये सहभागी होण्याच्या निमित्ताने जेनेलिया तिच्या मुंबईतील सेंट अँड्र्यू कॉलेजमध्ये गेली होती. त्या दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेयर करत तिने आपल्या कॉलेज दिवसाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
अधिक वाचा : हॉट लूकसाठी काहीपण; Arshi Khan ने हॉट अन् बोल्ड दिसण्यासाठी केली Hips surgery
कॉलेजचे कॅम्पस, ग्राऊंड, ऑडिटोरियम झलक या व्हिडिओत दिसून येत असून, अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा कॉलेजमध्ये आल्याचा आनंद जिनिलीयाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना आपण पाहू शकतो. इतकेच नव्हे तर जेनेलियाने शालेय जीवनातील तिचे ट्रॉफी आणि सर्टिफिकेट सोबतचे फोटो देखील या व्हिडिओत शेयर केले आहेत.
अधिक वाचा : Sameer Khakhar: नुक्कड फेम अभिनेते समीर खक्कड यांचे निधन
हा व्हिडिओ शेयर करत ती लिहिते, “मला या आठवड्यात माझी दोन वर्षाची भाची नीताराच्या शाळेतून गेदरिंगसाठी आमंत्रण आलं, आणि काय आश्चर्य ते माझ्या सेंट अँड्र्यू कॉलेजच्या सभागृहात ठेवण्यात आलं! माझ्यासाठी हा खूप खास क्षण ठरला. कॉलेजचा तोच प्रवेशद्वार... त्याच पायऱ्या! जिथे कॉलेजच्या अनेक स्पर्धा, कॉलेज फेस्ट आणि सामाजिक उपक्रम आम्ही केले असे ते बास्केट कोर्ट...आणि कॉलेजचे जुने ऑडिटोरियम.. आणि हो माझ्या छोट्या परीचा स्टेज परफॉर्मन्स, जिथे काही वर्षांपूर्वी मी परफॉर्म केले होते... जून दिवस आठवले... कॉलेज आठवणी आणि बरंच काही”
हा व्हिडिओ नक्की पहा.
काही महिन्यांपूर्वीच जेनेलिया आणि रितेश देशमुख यांनी त्यांच्या लग्नाचा ११ वा वाढदिवस साजरा केला. जेनेलियाने रितेश सोबत एक फोटो पोस्ट करत लिहिले: “Dated till Eternity.” शिवाय आपल्या चाहत्यांसाठी एक इंस्टाग्राम रील शेअर केले आणि लिहिले: "हॅपी एनिव्हर्सरी पार्टनर. एनिव्हर्सरीच्या दिवशी एक रील तर बनतोच”.
रितेशने देखील जेनेलियासाठी सुंदर पोस्ट केली होती. त्याने दोघांचा फोटो शेयर करत "माझे सुख, माझी सुरक्षित जागा, माझे आयुष्य.... ११ व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा बायको." असे लिहिले.
रितेश देशमुख आणि जेनेलीया 2003 मध्ये आलेल्या तुझे मेरी कसम या चित्रपटाच्या सेटवर एकत्र भेटले होते, हा त्यांचा पहिला चित्रपट होता. आठ वर्षांहून अधिक काळ डेटिंग केल्यानंतर या जोडप्याने २०१२ मध्ये लग्न केले. आज त्यांना रियान आणि राहिल असे दोन मुले आहेत.
जेनेलिया डिसूझा आणि रितेश देशमुख यांनी मस्ती, तेरे नाल लव हो गया, आणि लय भारी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. रितेश देशमुखच्या ‘माऊली’ या मराठी चित्रपटातील ‘धुवून टाक’ या प्रसिद्ध गाण्यातही या जोडप्याने स्क्रीन स्पेस शेअर केली आहे. अलीकडेच या दोघांनी ‘मिस्टर मम्मी’ आणि वेड’ या चित्रपटात काम केले आहे.