Cannes Film Festival : मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा; जितेंद्र जोशी निर्मित गोदावरी पोहोचली कान्स चित्रपट महोत्सवात

मराठीमध्ये आता अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती होत आहे. विविध विषयांवर आधारित उत्तमोत्तम चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटातील कंटेंटही ताकदीचा वापरला जातो. कंटेट हाच मराठी चित्रपटांचा राजा असतो हे अगदी खरं आहे. जितेंद्र जोशींनी पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात पाय ठेवलं असून त्यांचा सिनेमा थेट सातासमुद्रापलिकडे पोहोचला आहे.

Godavari, selection for Cannes
सातासमुद्रापलिकडे पोहोचली गोदावरी, कान्ससाठी निवड   |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • जितेंद्र जोशीने यामध्ये मुख्य भूमिका देखील साकारली आहे.
  • जितेंद्र जोशींनी पहिल्यांदाच निर्माता म्हणून काम केलं आहे.
  • भारत सरकार तर्फे Cannes 2022 फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणाऱ्या स्क्रिनिंगसाठी पाठविण्यात येणाऱ्या सहा चित्रपटांच्या यादीत गोदावरीचा समावेश.

मुंबई : मराठीमध्ये आता अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती होत आहे. विविध विषयांवर आधारित उत्तमोत्तम चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटातील कंटेंटही ताकदीचा वापरला जातो. कंटेट हाच मराठी चित्रपटांचा राजा असतो हे अगदी खरं आहे. जितेंद्र जोशींनी पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात पाय ठेवलं असून त्यांचा सिनेमा थेट सातासमुद्रापलिकडे पोहोचला आहे. अभिनेता जितेंद्र जोशींनी ‘गोदावरी’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या सिनेमाची थेट कान्स या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये  निवड करण्यात आली आहे.

कान्स चित्रपट महोत्सवामध्ये आता मराठी चित्रपटांनीही मानाचं स्थान मिळवलं आहे. जितेंद्र जोशीचा निर्माता म्हणून ‘गोदावरी’ हा पहिलाच चित्रपट. आपल्या पहिल्याच चित्रपटाने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये स्थान मिळवल्याने जितेंद्रने त्याचा आनंद व्यक्त केला आहे. जितेंद्रने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ‘गोदावरी’चं पोस्टर शेअर करत ही आनंदाची बातमी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे.

“भारत सरकार तर्फे Cannes 2022 फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणाऱ्या स्क्रिनिंगसाठी पाठविण्यात येणाऱ्या सहा चित्रपटांच्या यादीत ‘गोदावरी’ला मानाचे स्थान!” असे जितेंद्रने पोस्ट शेअर करताना म्हटलं आहे. गोदावरीकाठच्या शहरामध्ये राहणाऱ्या निशिकांत देशमुख आणि त्याच्या कुटुंबाची कथा ‘गोदावरी’मध्ये दाखवण्यात आली आहे. जितेंद्र जोशीने यामध्ये मुख्य भूमिका देखील साकारली आहे. त्याचबरोबरीने नीना कुलकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे, विक्रम गोखले, प्रियदर्शन जाधव, सखी गोखले या कलाकारांच्या देखील या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल महाजन यांनी केले आहे. तसेच प्राजक्ता देशमुख आणि निखिल महाजन यांनी या चित्रपटाची कथी लिहिली आहे, आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये आपलं स्थान मिळवणारा हा चित्रपट प्रदर्शित कधी होणार याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी