Timepass 3 : ‘टाइमपास-३’ पाहिल्यानंतर हृता दुर्गुळेच्या सासूबाईंनी दिली 'ही' प्रतिक्रिया

मराठी पिक्चर बारी
Updated Aug 01, 2022 | 19:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mugdha Shah on Timepass 3 : 'टाइमपास- 3' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर अभिनेत्री हृता दुर्गुळेच्या सासूबाई अभिनेत्री मुग्धा शाह यांनी या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

 Mugdha Shah on Timepass 3
टाइमपास 3 नुकताच रिलीज झाला  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 'टाइमापास 3' प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
  • हृता दुर्गुळे आणि प्रथमेश परब प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
  • सिनेमाच्या प्रीमिअरला कलाकारांची मांदियाळी

Mugdha Shah on Timepass 3 : हृता दुर्गुळे आणि प्रथमेश परबची प्रमुख भूमिका असलेला ‘टाइमपास-३’ हा चित्रपट नुकतंच रिलीज झाला. या चित्रपटाच्या पहिल्या दोन्ही भागांनी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. प्रेक्षकांनी दोन्ही भागांना चांगला प्रतिसाद दिला. आणि आता  ‘टाइमपास -३’ प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतंच अभिनेत्री हृता दुर्गुळेच्या सासूबाई अभिनेत्री मुग्धा शाह यांनी या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.


‘टाईमपास -३’या चित्रपटाचा प्रीमिअर शो शुक्रवारी मुंबईत पार पडला. सिनेमाच्या प्रीमिअर शोला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. यावेळी हृता दुर्गुळेचा नवरा प्रतिक शाह आणि सासूबाई मुग्धा शाहसुद्धा उपस्थित होत्या. मुग्ध शाह यांनी सिनेमा पाहिल्यानंतर हृताच्या अभिनयाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

अधिक वाचा : मंगळागौरी पुजनाच्या मराठीतून द्या शुभेच्छा

काही दिवसांपूर्वीच हृताचा अनन्या हा सिनेमा रिलीज झाला आणि आता हृताचा टाईमपास 3 रिलीज झाला आहे. सिनेमाच्या प्रीमिअर दरम्यान हृता आणि तिची सासू यांच्यातलं बाँडिंगसुद्धा दिसलं. मुग्धा शाह यांनी काळ्या रंगाचा वनपीस वेअर केला होता. तर हृताने चेक्सची ट्राऊझर आणि जॅकेट घातले होते. दोघींचा स्टायलिश अंदाज यावेळी पाहायला मिळाला. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Prateek Shah (@prateekshah1)


हृताने या सिनेमात पालवीची भूमिका साकारलेली आहे. तर प्रथमेश परब दगडूच्या भूमिकेत आहे. प्रीमिअर दरम्यान, हृताच्या अभिनयाबद्दल, तिच्या कामाबद्दल सासूबाई मुग्धा शाह यांना विचारले असता त्या म्हणाल्या, “आम्ही दोघींनी दुर्वा नावाची एक मालिका केली होती. यात तिने माझ्या मुलीची भूमिका केली होती. ती तिची पहिलीच मालिका होती. तेव्हापासून आतापर्यंत आता तिच्या अभिनयात खूप फरक पडला आहे. दोन वेगवेगळ्या भूमिका असलेले सिनेमा एकाचदरम्यान रिलीज होणं हे चांगलं आहे. हृताने या सिनेमात खूप चांगले काम केले आहे. हृता, मला तुझा खूप अभिमान वाटतो.” असेही सांगायला त्या विसरल्या नाहीत. 

अधिक वाचा :  पोटाची चरबी कमी करायचीय? रात्री झोपण्यापूर्वी खा 'हे' पदार्थ

टाईमपास म्हटलं की डोळ्यासमोर येते दगडू आणि प्राजूची जोडी. बालपणी प्रेमात पडलेले हे दोघं तरुणपणात एकमेकांना भेटले. मात्र, बालपण आणि तरुणपण यादरम्यानच्या काळात दगडू कुठे होता? त्याने काय केले? प्राजू त्याच्यापासून दूर गेल्यानंतर त्याच्या आयुष्यात काय बदल झाले हे सारं काही दाखवण्यात आलं आहे टाईमपास 3 या सिनेमात. रवी जाधव यांचे दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात संजय नार्वेकरही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी