Salman Khan in Marathi movie : बॉलिवूडचा दबंग खान अर्थातच सलमान खानचं मराठी प्रेम तुम्हा आम्हा सगळ्यांनाच ठाऊक आहे. सलमान खान याआधी रितेश देशमुखच्या लय भारी या सिनेमात दिसला होता. आता तो पुन्हा एकदा एका नव्या मराठी सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात मराठीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि जिनिलिया देशमुख प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. महत्वाचं म्हणजे या दोघांसोबत सलमान मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
जिनिलिया आणि अशोक सराफ यांच्या या सिनेमाचं दिग्दर्शन रितेश देशमुखने केले आहे. अभिनयानंतर आता रितेशने दिग्दर्शनात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. या मराठी चित्रपटाचे नाव ‘वेड’ असे आहे. सिनेमातील एका गाण्यात सलमान खान दिसणार आहे. लवकरच या सिनेमाचं चित्रीकरण सुरू होणार आहे. अभिनेत्री म्हणून जिनिलियाचा हा पहिला सिनेमा असेल, या सिनेमातून ती चित्रपटसृ्ष्टीत पदार्पण करणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं होतं.
जिया शंकरही या सिनेमात झळकणार आहे. लय भारीपासून रितेशच्या सिनेमांना संगीत देणारी मराठीतील प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुलने या सिनेमाला संगीत दिलेले आहे. सलमान खान या सिनेमासोबतच शाहरुख खानच्या बहुचर्चित पठाण या सिनेमातही दिसणार आहे. सध्या 'कभी ईद कभी दिवाली' या सिनेमाचं हैदराबादमध्येशूटिंग सुरू आहे. पूजा हेगडे, शहनाज गिल, पलक तिवारी, यांच्या या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
सलमान खानने लय भारी या सिनेमात साकारलेली भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती वारकऱ्याच्या भूमिकेत झळकलेला सलमान एका छोट्याशा सीनमध्ये झळकला होता. त्या एका सीनमध्ये सलमानने धमाल उडवून दिली होती. त्यामुळे आता पुन्हा या सिनेमात सलमान काय धमाल करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमातील एका गाण्यात सलमानचं दर्शन होणार आहे त्यामुळे जिनिलिया आणि सलमानचा डान्स पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार का? ते सिनेमा रिलीज झाल्यानंतर कळेलच. तोपर्यंत जस्ट वेट अँड वॉच.